चंदीगढ : पंजाबमधील एक अशी बातमी समोर आली आहे, की या बातमीने सख्ख्या भावा बहिणाच्या नात्यावर प्रश्न चिन्हा उभे केले आहे. ज्या कोणी ही बातमी ऐकली आहे, त्या सर्वांना मोठा धक्का बसला आहे. लोकांना त्यामुळे हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे की, असे काय झाले असावे की, सख्या भावा बाहिणीला एकमेकांशी लग्न करावे लागले असेल? या मागचे खरं कारण आता पोलिसांसमोर आले आहे. या बहिणीला ऑस्ट्रेलियाला शिफ्ट व्हायचे होते आणि तिला तिकडची सिटीझन शिप मिळावायची होती, यासाठी तिने आपल्या भावासोबत लग्नं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेबद्दलं जेव्हा एका महिलेला माहिती मिळाली तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आले आहे. या सगळ्या प्रकरणांत या बहिण भावांचे आई-वडील देखील सामील होते. त्यांच्य़ा सहमतीने हे लग्न करण्यात आले होते.


खरेतर पंजाबमधील एका गावातील मुलीला परदेशात स्थायिक व्हायचे होते. परंतु तिला व्हिसाची समस्या येत होती. त्यामुळे तिने भावाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.


पोलिस निरीक्षक जयसिंग म्हणाले, "तपासणीनुसार आम्हाला आतापर्यंत समजले आहे की, या बहिणीचा सख्ख्या भाऊ ऑस्ट्रेलियाचा स्थायी रहिवासी आहे. बहिणीला देखील परदेशात स्थायिक व्हायचे होते यासाठी तिला स्थानिक व्हिसा लागणार होता. म्हणून त्यांनी गुरुद्वाराकडून लग्नाचे कागदपत्र बनवले आणि या बहिणीचे खोटे कागदपत्र बनवले.


या संदर्भात पुढे बोलताना निरीक्षक म्हणाले की, "यांनी परदेशात राहाण्यासाठी सामाजिक व्यवस्था, कायदेशीर व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्थेचा विश्वासघात केला आहे. आम्ही त्यांना शोधत आहोत, परंतु ते अद्याप पोलिसांचा हाती लागलेले नाही."


बनावट कागदपत्रांच्या मदतीने ही मुलगी आपल्या भावासोबत ऑस्ट्रेलियाला निघून गेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फसवणूकीचे गंभीर प्रकरण आहे. ज्यामध्ये संपूर्ण कुटूंबाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इंस्पेक्टर जयसिंग म्हणाले- "परदेशात जाण्यासाठी लोकं अनेक प्रकारची फसवणूक करतात. पण सख्ख्या भावाशी लग्न करून परदेशात जाण्याची ही घटना पहिल्यांदाच ऐकायला मिळाली आहे. यामुळे आम्हाला देखील याचा धक्का बसला आहे."