नवी दिल्ली: भारतात जुगाडची काही कमी नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये जुगाड शोधला जातो. अगदी कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात लोकांनी जुगाड केले. इतकच कशाला कोरोना विरुद्ध लढण्यासाठी राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेतही लोकांनी जुगाड केले. सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे जुगाड पाहायला मिळत असतात. असाच एक अजब जुगाड सध्या चर्चेत आहे. हा जुगाड पाहून अनेक जणांना हसू आवरलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे पेट्रोल-डिझेल महाग झालं आहे. महागाई वाढली त्यामध्ये अनेकदा संपूर्ण फॅमेली एकाच स्कुटरवर कोंबून बसवल्यासारखी जाताना अनेकदा हे दृश्यं पाहिलं असेल. मात्र इथे तर हद्दच झाली. एक दोन नाही तर सर्व मजुरांना बसून जाता यावं यासाठी दुचाकीचा जुगाड करण्यात आला. एका दुचाकीवर चक्क 6 जण बसून जात असल्याचं दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


जर तुम्ही त्यांना एकमेकांना चिकटून किंवा बाईकवर लटकत असल्याची कल्पना करत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण हे 6 लोक बाईकवर फक्त आरामात बसलेले नाहीत, तर त्यांच्याकडे इतकी जागा आहे की ते आणखी काही लोकांना बसू शकतात. त्यांचा हा जुगाड सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. 


या व्हिडीओमध्ये पाहू शकता की 6 लोक आपापल्या सामानासह आरामात बाइकवर बसले आहेत. आता तुम्ही असा विचार करत असाल की बाईकच्या छोट्या सीटवर हे कसे शक्य आहे. तर जुगाड पाहून तुमच्या ते लक्षात येईल. या जुगाडाला तुम्ही काय म्हणाल. असा जुगाड धोक्याचा ठरू शकतो. मात्र त्यांचं धाडसाचं कौतुकही आहे. या लोकांनी बाईकला जोडून शिडी लावली आहे. या शिडीखाली पाईप देखील जोडले आहेत. 


शिडीचा वापर असाही होऊ शकतो असा विचार स्वप्नातही येणार नाही. मात्र या लोकांनी त्याला सीटसारखं वापरलं आहे. त्यांचा हा जुगाड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशा प्रकारचे जुगाड करणं धोक्याचं ठरू शकते. @Giedde या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 



सूचना- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही.