आता, पेट्रोलवर नाही `बिअर`वर चालणार कार...
आत्तापर्यंत तुम्ही पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीवर चालणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील... पण, बिअरवर चालणारी गाडी पाहिलीत का?
मुंबई : आत्तापर्यंत तुम्ही पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीवर चालणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील... पण, बिअरवर चालणारी गाडी पाहिलीत का?
नाही ना... कारण, कदाचित येत्या काही वर्षांत तुम्हाला तुमचीच गाडी बिअरवर चालवता येऊ शकेल. 'युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल'च्या एका संशोधनाच्या माध्यमातून हे शक्य असल्याचं समोर आलंय.
इंधनाच्या समस्येतून अनेक प्रगत देशही सुटू शकलेले नाहीत. त्यामुळे बिअरवर गाडी चालवणं शक्य झालं तर बिअरचा खप नक्कीच वाढेल...
बिअरमध्ये आढळणारा एथेनॉल ब्युटेनॉलमध्ये परिवर्तीत केला जाऊ शकतो... आणि हा पारंपरिक इंधनाचा एक चांगला पर्याय असू शकतो. जगभरातील अनेक देश पारंपरिक इंधनाऐवजी ब्युटेनॉलचा वापर इंधन म्हणून करत आहेत.
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, तो दिवस दूर नाही... जेव्हा बिअरपासून इंधन बनवलं जाईल. २०२२ पर्यंत हे नक्कीच शक्य आहे.