viral dabbu uncle video: सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम (shadi season) सुरू आहे. लग्न म्हटलं की नाचं गाणं आलंच. घरात लग्न म्हटलं की सगळ्यांमध्ये उत्साह असतो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजणच लग्नाचा आनंद साजरा करत असतो. आता लग्नांमध्ये संगीतचा ट्रेंड  आला आहे. अगदी मराठमोळ्या लग्नांमध्ये देखील संगीतचा कार्यक्रम केला जातो. या लग्नांमध्ये घरातील मंडळी खास डान्स बसवतात. आणि वर - वधुला सरप्राईज देतात. अशा संगीतातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यंतरी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एक काकांनी  गोविंदाच्या "आपके आ जाने से"  (govinda song aapke ajanese) या गाण्यावर डान्स करत एकच हवा केली होती.


गोविंदा म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवतं ते म्हणजे  त्याच्या सिनेमातील गाणी आणि त्याचे डान्स. आजही गोविंदाची गाणी आवडीने पाहिली जातात. कारण एकच आहे ते म्हणजे गोविंदाचा डान्स.


असाच या काकांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता . या डान्सवर अनेकांनी पसंती दर्शवली होती अनेकांनी या गाण्यावर परफॉर्म करून वाहवा मिळवली होती. आता पुन्हा एकदा हे डब्बू अंकल आणि डान्स ट्रेंड मध्ये आहे कारण 'शादी का सिझन है'.. !



आणखी एक व्हिडीओ झाला होता फेमस आधीच्या हिट डान्सनंतर आणखी एक डान्स खूप फेमस झाला होता.. गोविंदाच्या अखियों से गोळी मारे या गाण्यावर डब्बू अंकल पुन्हा थिरकले होते अनित्य व्हिडीओलासुद्धा प्रचंड प्रसिध्दी मिळाली होती .