अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये! हृदय पिळवटून टाकणारा Video Viral
Viral Video : मन सुन्न करणारी आणि हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये...
Shocking Viral Video : आई वडील आणि मुलांचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असतं. बाप लेकीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. आई वडिलांची कायम इच्छा असते आपल्या लेकांना उदंड आयुष्य लाभो आणि ती कायम सुखी राहवे. पण अकस्मात अशा घटना घडतात की, डोळ्यादेखत मुलांना कमी वयात प्राण सोडताना आई वडिलांना पाहवं लागतं. त्या माते आणि वडिलांसाठी हे आयुष्यभराचं दु:ख असतं. असाच एक मन सु्न्न करणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओने सगळेच निशब्द झाले आहेत.
अशी वेळ कुठल्याही वडिलांवर येऊ नये!
एका सरकारी रुग्णालयात 13 वर्षीय मुलीने उपचारा दरम्यान जगाचा निरोप घेतला. वडिलांवर दु:खाचं डोंगर कोसळलं असताना रुग्णालयाने अजून एक घाव दिला. मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी या वडिलांना रुग्णवाहिनीची गरज होती. पण त्या व्यक्तीचं गाव रुग्णायलयापासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्यामुळे नकार दिला. कारण सरकारी रुग्णवाहिनी ही फक्त 15 किमीच्या अंतरावर जाते असं त्या वडिलांना सांगण्यात आलं. (Viral father takes daughter body home on bike hospital denies ambulance Video on Social media)
माणुसकी कुठे हरपली?
मुलीला शेवटं गावी तिच्या घरी तर न्यायला हवं. मग काय करणार ...अशावेळी हताश वडिलांना मुलीचा मृतदेह मग बाइकवर घेऊन जाण्याची वेळ आली. या घटनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. निशब्द आणि मनं सुन्न करणार हा व्हिडीओने अनेकांची झोप उडवली आहे.
असे अधिकारी अजून हवेत!
आजही खेडे गावात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. माणुसकी कुठे हरपली आहे, असंच हा व्हिडीओ पाहून दिसतं. दुसरीकडे या हताश वडिलांची व्यथा जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांना कळतातच त्यांनी रुग्णवाहिनीची व्यवस्था केली. गावापासून 20 किलोमीटर असताना वैद्य यांनी रुग्णवाहिनी या वडिलांना देण्यात आली. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेशही जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांनी दिले आहेत.
वडिलांचं नाव लक्ष्मण सिंह असून 13 वर्षांची मुलगी माधुरी हिचं सोमवारी रात्री सिकलसेल अॅनिमियामुळे मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशातील शडहोलमधील आहे. तर लक्ष्मण सिंह हे कोटा गावातील रहिवासी आहेत. रुग्णालयाने रुग्णवाहिनी नकारल्यामुळे आणि पैशांच्या कमतरतेमुळे लक्ष्मण यांना मुलीचा मृतदेह मोटारसायकलवर नेण्याची वेळ आली.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा मदतीमुळे मुलीच्या मृतदेह गावी पोहोचला आणि तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहडोल जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबाला काही आर्थिक मदत आदेशही दिली आहेत. दरम्यान हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर sunnobc या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.