ATM : भारतात टॅलेंटची काहीच कमतरता नाही. जगातील मोठमोठ्या कंपनीच्या प्रमुखपदी आज भारतीय चेहरे दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. ज्यामुळे अनेकांच्या कर्तृत्वाला वाव मिळतो. अशातच मोठमोठ्या इंजिनियर्सला जे जमलं नाही ते काम एका 10वीच्या विद्यार्थ्याने करून दाखवलंय. (ATM machine made by Bharat Jogal, a class 10 student)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भरत जोगल नावाच्या एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने चक्क एटीएम मशीन तयार करण्याचा पराक्रम केला आहे. या एटीएम मशीनद्वारे शंभर आणि दोनशेच नाही तर 1 रुपये,2 रुपये त्याचबरोबर 10 रुपये देखील काढू शकतो. ज्यासाठी वेगवेगळे बॉक्स तयार करण्यात आले आहेत. लहानपणापासून भरतला एटीएम मशीन बनवण्याची इच्छा होती. शाळेच्या प्रोजेक्ट निमित्त त्याला ही संधी मिळाली आणि त्याने संधी सोनं करत ही मशीन बनवून दाखवली. 


ATM मशीनसाठी घरगुती गोष्टींचा वापर 


विशेष गोष्ट म्हणजे, या विद्यार्थ्याने घरगुती वस्तूंचा वापर करून ही मशीन तयार केली. ही मशीन ओरिजनल एटीएम मशीनप्रमाणे काम करते. ज्यामध्ये कार्ड टाकल्यावर चार आकडी पिन टाकावा लागतो. त्यानंतर गरज लागेल तसे पैसे वापरकर्त्यांना काढता येणार आहे. भारत सरकारच्या स्कीमच्या माध्यमातून भरतला स्वप्न पुर्ण करता आलंय.


भरतने तयार केलेल्या मशिनचं सेलेक्शन स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलसाठी झालं आहे. घरगुती गोष्टींचा वापर करून हे एटीएम मशिन तयार केल्याने भरतची मशीन चर्चेचा विषय ठरलीये. वायर, कागद, मोटर इत्यादी गोष्टींचा वापर देखील करण्यात आलाय. ही मशीन तयार करण्यासाठी भरतला खूप मेहनत घ्यावी लागली होती.