Viral Post of Student Giving Answer on Widow Remarriage: लहान मुलांचे विश्व हे फार वेगळे (Students) असते त्यातून त्यांना अनेक गोष्टींची जाण ही लहानपणापासूनच येयला सुरूवात होते. आजची मुलं ही त्यातूनही हूशार आहेत. पिढ्यान् पिढ्यांपासून आपण 'जनरेशन गॅप' (Generation Gap) ही संकल्पना वाचत आलो आहोत. त्यातून आजच्या मुलांमध्ये बुद्धी (Intelligence) ही लवकर विकसित होऊ लागली आहे. सध्या अशाच एका लहानग्या मुलाची हूशारी पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. या लहान मुलाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुम्हालाही (Student Exam Paper Viral Post) आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या त्याची उत्तरपत्रिका ही सोशल मीडियावर (Social Media) जोरात व्हायरल होताना दिसते आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की हा प्रश्न होता तरी काय आणि पाचवी असलेल्या या चिमुरड्यानं त्या प्रश्नाचे कसे उत्तर दिले आहेत, तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल ना? (Viral news a 5th std students answer expresses netizens he wrote in his exam paper post goes viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परीक्षा म्हणजे लहान मुलांच्या बुद्धमत्तेची (IQ Test) एकप्रकारी चाचणी असते. परीक्षेचे मुलांना ओझे न वाटता त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुभव देणारा भाग असावा, असेच प्रत्येक पालकाला आणि शिक्षकाला वाटते परंतु हल्ली शिक्षण क्षेत्राची फारच वेगळी संकल्पना तयार होते आहे परंतु परीक्षेचा इतका चांगला सदूपयोग करणारा या इवल्याश्या मुलानं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहे. नक्की त्यानं असं केलंय तरी काय, हे वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल हे मात्र खरं! 


सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होताना दिसते आहे. या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक प्रश्नपत्रिका Exam Paper Leak) आहे आणि त्यातील प्रश्नांची उत्तरं एका लहान मुलानं त्याच्या सुंदर अक्षरात लिहिलं आहे. ट्विटरवर पाथफाइंडर पब्लिशिंग इंडिया प्राइवेट लिमिटेड या कंपनीच्या सीईओ आणि संस्थापक महेश्वर पेरी (Maheshwar Peri Post) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी लिहिलंय की, 'माझ्या पाचवीतल्या लहान मुलानं या प्रश्नाचे उत्तर त्यानं दिलेल्या (Maheshwar Peri Son) परीक्षेत लिहिले आहे.' या उत्तराखाली शिक्षकाने चांगले रिमार्क्स दिले आहेत आणि लिहिले आहे की, वेरी गुड आन्सर म्हणजे खूप छान उत्तर लिहिलं आहेस. 



जर तुम्ही स्वातंत्र्यपुर्व काळात एखादे समाज सुधारक असता तर त्यावेळी समाजात सुरू असलेल्या कुठल्या वाईट परंपरेला तुम्ही थांबवण्यासाठी प्रयत्न केला असता?, असा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला होता त्यावर या मुलानं काय लिहिलंय पाहा - मला विधवा पुनर्विवाह (Widow Remarriage Act) कायदा लागू करायला आवडला असता. पुर्वीच्या काळी विधवा स्त्रियांना सती (Sati Tradition) जावे लागत असे त्यातून त्यांना आयुष्यभर पांढरी साडी घालावी लागे त्या कसे बांधून कुठेही बाहेर जाऊ शकत नाहीत. तेव्हा अशावेळी त्यांचा पुर्नविवाह (Remarriage) करता आला असता तर त्यांना चांगले आणि आनंदी आयुष्य जगता आले असते. त्याच्या या उत्तरामुळे अनेकांना आनंद वाटला आहे.