मुंबई : सिनेमामधील तुम्ही अभिनेता आणि अभिनेत्रीच्या प्रेमाचे वेगवेगळे किस्से तुम्ही पाहिले असणार. ज्यामध्ये नायक त्याच्या गर्ल फ्रेंडला वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज करतो किंवा तिला लग्नासाठी मनवण्याचा प्रयत्न करतो. एवढेच काय तर सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारे प्रियकराने आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज केल्याचे तुम्ही पाहिले असणार. हे प्रियकर आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी आणि तिला  सप्राइज देण्यासाठी नवनवीन उपाय आणि पर्याय शोधत असतात, जे खूप भन्नाट असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक सगळ्यात वेगळ्याप्रकारचा प्रपोज या प्रियकराने आपल्या प्रेयसीला केला आहे. जो सगळ्या लग्नाच्या प्रपोजपेक्षा वेगळा आणि सप्राइजिंग आहे.


आपल्याकडे असे फारच कमी लोकं असतील ज्यांना पाणीपूरी आवडत नसावी. कारण हा सगळ्यांचा आवडीचा खाद्य पदार्थ आहे, त्यात पानीपुरी हा पदार्थ म्हणजे मुलींचा जीव की प्राण आणि अशा पदार्थामधून जर कोणत्या मुलीला लग्नाचा प्रपोज करण्याची युक्ती जर प्रेयकराने काढली तर, कोणती मुलगी तयार होणार नाही बरे...??


म्हणून तर या मुलाने आपल्याला आवडत असलेल्या मुलीला लग्नाचा प्रपोज करण्यासाठी पानीपुरीमध्ये अंगठी ठेवली आणि तिला सप्राइज केले. असा प्रपोज पाहिल्यानंतर ती मुलगी सुद्धा त्या मुलाला नाही बोलू शकली नाही आणि तिने ही लग्नासाठी आपली संमती दर्शवली आहे.



सोशल मीडियावर लोकं या अनोख्या प्रेम कहाणीची चर्चा करत आहेत. लोकं या व्हीडिओवर मोठ्या प्रमाणावर कमेंट्स करत आहेत. तर काही लोकांचे असे म्हणने आहे की, 'प्रेयसीच्या आवडीच्या पदार्थामधून तिला प्रपोज करणे ही खरोखरच एक चांगली युक्ती आहे. ट्राय करायला काहीच हरकत नाही.'