मुंबई : आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे काही ना काही विचित्र कृत्य करत असतात. जे काही वेळेला खूप मनोरंजक असतात. ते पाहून आपल्याला आपले हसू आवरत नाही. तर काही वेळेला हे कृत्य असे असतात की, जे पाहून काही सेकंदासाठी आपण थक्कं होतो. असेच काही व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ज्यामुळे आपले मनोरंजन होते आणि काही व्हिडीओने आपल्याला शिकवण देखील मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही काही काळ विचार करत स्तब्ध उभे राहाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण हे बऱ्याचदा लोकांना बोलताना ऐकलं आहे की, वेळेला खूप महत्व आहे आणि खेळात किंवा परिक्षेत तुम्हाला माहितच आहे की, एका सेकंदाची किंमत काय आहेते. कारण एका सेकंदात संपूर्ण खेळ पलटू शकतो. त्याचप्रमाने या व्हिडीओतील माणसासाठी एक सेकंद महत्वाचा ठरला. त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून हे तर नक्की आहे की, एका सेकंदाची किंमत हा व्यक्ती पुन्हा कधीही विसरणार नाही.


या व्हिडिओमध्ये काही मुलं पुलावरून नदीत उडी मारत आहेत. प्रथम एक मुलगा नदीत उडी मारतो. पण दुसरा मुलगा नदीत उडी मारताना थोडा वेळ थांबतो, थोडा विचार करतो आणि मग उडी मारतो. तेवढ्यात एक बोट तेथून जाते. परंतु सुदैवाने काही सेकंदाच्या फरकाने या मुलाचा जिव वाचतो. अन्यथा खूप मोठा अपघात घडला असता.


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, लोकं वेगवेगळ्या प्रकारे यावर कमेंट्स करत आहेत. तर काही लोकं या तरुणाच्या नशीबाचे कौतुक करत आहे हा व्हिडीओला इन्स्टाग्रामवर 'मीमलॉजी' नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे.


हा व्हिडीओ आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर युजर्स व्हिडीओचा आनंद घेताना मजेदार कमेंट्स देखील करत आहेत.


 


 

एका यूजरने लिहिले, 'याला म्हणतात नशीब'. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले, ' हा आणखी एक सेकंद थांबला असता, तर याचे काय झाले असते'.