Viral News : बऱ्याचदा वाचण्यात असे काही संदर्भ येतात, जिथं टएक राजा असतो, मग तो प्रजेचा हालहवाला जाणून घेण्यासाठी एके दिवशी थेट सामान्यांच्या रुपात प्रजेतच जाऊन वावरतो. तिथं गेलं असता त्या राजाला प्रजेच्या मनात नेमकं काय सुरुय याचा अंदाज घेता येतो. त्यांच्या व्यथा कळतात....' वगैरे वगैरे. मुळात कोणत्याही गोष्टीचं मूळ जाणून घ्यायचं असेल तर त्या वर्तुळात वावरा असंच अनेक मोठी मंडळी सांगून गेली आहेत आणि एका जिल्ह्याधिकाऱ्यांनी या सिद्धांताचा वापरही केल्याचं नुकतंच पाहायला मिळालं आहे. 


जिल्हाधिकारी शेतकऱ्याच्या वेशात आले आणि... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्तीसगढमधील सरगुजा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी विलास भोसकर यांनी शेतकऱ्याचा वेश धारण करत थेट नजीकचं धान्य खरेदी केंद्र गाठलं. इथं ते इतर शेतकऱ्यांसमवेत तासन् तास रांगेत उभे राहिले, त्यांच्यासमवेत त्या ठिकाणी एसडीएम रवी राहीसुद्धा होते. 'आज तक'च्या वृत्तानुसार 'पेटला धान उपार्जन केंद्र' इथं जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या वेशात टोकनपासून धान्यमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. 


शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी तेथील कार्यपद्धती जाणून घेत तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यवहारावरही कटाक्ष टाकला. ज्या क्षणी ही व्यक्ती सामान्य शेतकरी नसून, जिल्हाधिकारी आहे हे कळलं तेव्हा मात्र तिथं असणाऱ्यांचे डोळे चमकले. 


उपलब्ध माहितीनुसार विलास भोसकर आणि एसडीएम रवी राही यांनी ट्रॅक्टवर स्वार होत गुरुवारी थेट धान्य खरेदी केंद्र गाठलं आणि तिथं त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या वेशात टोकन प्रक्रियेची माहिती मिळवली. डोक्यावर गमछा, काहीसा शेतकऱ्यांसारखाच पेहराव अशा रुपात आपल्याला कोणीही ओळखणार नाही याची काळजी घेत हे अधिकारी तिथं वावरत होते. 


सामान्यांशी संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेत अधिकारी ही संपूर्ण यंत्रणा जवळून समजून घेत होते. पण, ज्या क्षणी ही माणसं कोण आहेत यावरून पडदा उठला तेव्हा मात्र तिथं असणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला आणि त्यांनी या अधिकाऱ्यांना सलाम ठोकला. आपल्या या निरीक्षण दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना कोणत्याची अडचणी येणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश समिती प्रबंधकांना दिले. धान्य खरेदी प्रक्रियेदरम्यान सतर्क राहत या व्यवहारात पारदर्शीपणा आणण्याचा आग्रही सूर त्यांनी आळवला. 


हेसुद्धा वाचा : विराट कोहली, सुनील शेट्टीसह नीरज चोप्राच्या डायटमध्ये एक गोष्ट कॉमन; आजचपासून सुरू करा! 


इतक्यावरच न थांबता जिल्हाधिकाऱ्यांनी सीतापूर येथील सहकारी बँक गाठली. जिथं, शेतकरी धान्यविक्रीनंतर पैसे काढण्यासाठी रांगेत उभी असल्याचं त्यांनी पाहिलं. इथंही त्यांनी रांगेत उभं राहत आपली चौकस नजर येथील व्यवहारावर टाकली. बँक पासबुक भरल्यापासून तेथील संपूर्ण कार्यपद्धचीचाही त्यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांप्रती व्यवहार कायम चांगलाच असला पाहिजे असा आग्रही सूर त्यांनी या दोन्ही भेटींदरम्यान आळवल्याचं पाहायला मिळालं. अधिकाऱ्यांच्या येण्यानं येथील यंत्रणांची तारांबळ उडाली असली तरीही सामान्यांची मनं मात्र या अधिकाऱ्यांनी जिंकली असं म्हणणं गैर ठरणार नाही.