छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात हैराण करणारं एक प्रकरण समोर आलं आहे. दुर्ग जिल्ह्यात राहाणाऱ्या एका उद्योगपतीने आपल्या मोठ्या मुलाचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं. पण मधुचंद्राच्या रात्री मुलीची पोलखोल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मुलाच्या कुटुंबियांना मुलगी आपल्या समाजातली आहे असं समजून लग्न लावून दिलं. पण मधुचंद्राच्या रात्री संशय आल्याने मुलाने पत्नीकडे आधारकार्डची मागणी केली. पण ते देण्यास मुलीने टाळाटाळ केली. पण ज्यावेळी सत्य समोर आलं त्यावेळी मुलाच्या कुटुंबियांना धक्का बसला. मुलाच्या कुटुंबियांकडून मुलीसह सात जणांविरोधात तक्रार दाखल केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?


ही घटना दुर्ग जिल्ह्यातील शनिचरी बाजारीतली आहे. इथं राहाणारा एक उद्योगपती आपल्या 43 वर्षांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. उद्योगपती कुटुंब हे जैन समाजातील आहे. त्यामुळे आपल्याच समाजातील मुलीशी मुलाचं लग्न व्हावं अशी कुटुंबियांची इच्छा होती. मुलाला पाच बहिणी आहेत. मोठ्या मुलाचं लग्न होत नसल्याने बहिणींची लग्नही रखडली होती. त्यामुळे कुटुंबिय चिंतित होतं. वय वाढत असल्याने मुलाचं लग्न जमत नव्हतं. याचदरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाने इंदोरमधल्या लग्न जुळवणाऱ्या संस्थेचं नाव सुचवलं. या संस्थेने पूर्वी भारती नावाच्या मुलीचं स्थळ सुचवलं.


मुलाचं संपूर्ण कुटुंब इंदोरमध्ये मुलीला पाहण्यासाठी आलं. यावेळी घरात एक मुलगा होता, जो मुलीचा भाऊ असल्याचं सांगण्यात आलं. मुलाने आपण जैन समाजातले असल्याचं मुलाच्या कुटुंबियांना सांगितलं. पण बहिणीचं लग्न करण्यासाठी त्यांनी मुलाकडे दिड लाखाची रक्कम मागितली. मुलाच्या कुटुंबियांना मुलगी आवडली होती, त्यामुळे त्यांनी तात्काळ शगुन म्हमून 11 हजार रुपये मुलीच्या कुटुंबियांकडे दिले.


उद्योगपती कुटुंबातलं पहिलं लग्न असल्याने मुलाचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून देण्यात आलं. लग्नात तब्बल 16 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. तसंच मुलीच्या कुटुंबियांना त्यांनी मागितलेली दीड लाखांची रक्कमही दिली. लग्नाचा सर्व खर्च मुलाच्या कुटुंबियांनी केली. मुलाला आला संशय लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी आली.


मधुचंद्राच्या रात्री मुलाने मुलीकडे आधारकार्डाची मागणी केली. पण आधारकार्ड देण्यास मुलीने टाळाटाळ करत नंतर देऊ असं सांगितलं. यामुळे मुलाला संशय आला. यानंतर मुलाने आपल्या नातेवाईकांच्या मार्फत मुलीचं आधारकार्ड शोधून काढलं. आधारकार्डवर असलेल्या आडनावावरुन मुलगी जैन समाजातील नसल्याचं समजलं. आपली फसवणूक झाल्याचं कळताच मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांनी मुलीविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली.