Viral Story : आजकल पैसे काढण्यासाठी नागरीक बँकेत जाण्यापेक्षा एटीएममध्ये (ATM) जाणे पसंत करतात. कारण एटीएममध्ये बँकेपेक्षा लवकर काम होतात. त्यामुळे बुहतांश लोक एटीएमचाच वापर करतात. अशाच एका एटीएम (ATM) वापरकर्त्यांला लॉटरी लागली आहे. एटीएममध्ये पैसे काढायला गेला आणि मालामाल झाल्याची घटना घडली आहे. असे निव्वळ एका व्यक्तीसोबत नव्हे, तर आणखीण दोन-तीन व्यक्तींसोबत घडलेय. त्यामुळे ही घटना एकूण एटीएमबाहेर आता नागरीकांची गर्दी जमलीय. या घटनेची एकच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुलरीहाच्या महाराजगंज चौकात इंडिया वन एटीएम (ATM) आहे. या एटीएममध्ये एक तरूण पैसे काढण्यासाठी गेला होता. या एटीएममधून पैसे काढल्यानंतर तो मालामाल झाला आहे. त्याच्यानंतर एटीएममध्ये गेलेल्या इतरही व्यक्तींची लॉटरी लागली आहे. त्यामुळे या एटीएमबाहेर नागरीकांनी आता पैसे काढण्यासाठी गर्दी केलीय.  


 


हे ही वाचा : विमानात अचानक तब्येत बिघडली, अन् 'त्या' व्यक्तीमुळे जमिनीपासून 32000 फूट उंचावर चमत्कार घडला 


 


घटना काय?


मंगळवारी एका तरुणाने एटीएममध्ये (ATM) जाऊन 400 रूपये काढण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी एटीएममधून 200 रूपयांच्या दोन नोटा बाहेर येण्याऐवजी पाचशे रूपयांच्या दोन नोटा निघाल्या होत्या. आणि हे पैसे घेऊन तरुण निघाला होता. या तरूणानंतर आणखीण काही लोक देखील एटीएममध्ये आली होती. त्यांना देखील 400 आणि 600 रूपये काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना देखील त्या बदल्यात 500 रूपयाच्याच नोटा आल्या होत्या. त्यामुळे त्यांना देखील लॉटरी लागली होती. 


गावात एकच चर्चा 


एटीएममधून (ATM) 500 रूपये बाहेर येत असल्याची माहिती कळताच अनेकांनी एटीएमबाहेर लाईन लावली होती. त्यामुळे नागरीकांची पैसे काढण्यासाठी एकच झूंबड उडाली होती. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.


 


हे ही वाचा : 500 रूपयांसाठी वणवण फिरली...शिक्षिकेने असं काही केलं की भरभरून मदत मिळाली 


 


पोलिसांनी एटीएम केलं बंद 


एटीएममध्ये (ATM) गर्दी झाल्याचे पाहून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सरहरी चौकीचे प्रभारी सुखदेव शर्मा यांनी घटनास्थळी पोहोचत एटीएमचे शटर डाऊन करून कुलूप बंद केले होते. तसेच या घटनेची माहिती ऑपरेटरला दिली. 


एटीएममधून इतके पैसे काढले?


पोलिसांनी (Police) या घटनेबाबत सांगितले की, एटीएममधून पाचशेच्या एकूण 180 नोटा काढण्यात आल्या होत्या. याची एकूण रक्कम 90 हजाराच्या घरात जाते. कॅश बॉक्समधील तांत्रिक बिघाडीमुळे ही घटना घडलीय. तसेच सकाळी कॅश व्हॅन घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये पैसे टाकल्याचा आरोप आहे. यावेळी कॅश बॉक्समध्ये ठेवायच्या असलेल्या रुपयांऐवजी पाचशेच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे एटीएममधून पाचशे रुपयांच्या नोटा निघाल्या.


दरम्यान उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोरखपूर जिल्ह्यात ही घटना घडलीय. या घटनेची चर्चा संपुर्ण राज्यात आहे.