असा रिक्षा स्टंट तुम्ही कधी पाहिलाय का? ज्याने नोंदवला गिनीज बुकमध्ये नाव, पाहा व्हिडीओ
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पेजने चेन्नईतील एका रिक्षाचालकाची ऑटो दोन चाकांवर चालवताना व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (Guinness World Records) इंस्टाग्राम पेज दररोज आपल्या आकाउंटवरती काही ना काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो, ज्यात अनेक जागतिक रेकॉर्ड आहेत. 6 ऑक्टोबर रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पेजने चेन्नईतील एका रिक्षाचालकाची ऑटो दोन चाकांवर चालवताना व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ 2016 चा असल्याचा समजले आहे. जगतीश एम (Jagathish M) यांनी 2 चाकांवर 2.2 किमी अंतरावर ऑटो चालवत आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
चेन्नईच्या ऑटो चालकाने खळबळ उडवून दिली
व्हिडीओ शेअर करताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर लिहिले आहे, "एपिक ऑटो-रिक्षा साइड व्हीली." चेन्नईस्थित ऑटो रिक्षाचालक जगतीश एम यांनी भारताच्या तुक तुक रिक्षा एका वेगळ्याच प्रकारे चालवून एक विक्रम केला आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की जगतीशने 'फास्टेस्ट साइड-व्हीली ऑन ऑटो रिक्षा' साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला होता. जगतीश जीडब्ल्यूआरला म्हणाले, 'हा विक्रम गाठता येईल असे मला कधी वाटले नव्हते, पण मी आनंदी आहे.' जीडब्ल्यूआरच्या विधानानुसार, जगतीशला कमीतकमी 1 किलोमीटर अंतरासाठी फक्त दोन चाकांवर राहावे लागले होते, परंतु त्याने आपली तीन चाकी रिक्षा दोन चाकांवर 2.2 किलोमीटर अंतर चालवून एक विक्रम प्रस्थापित केला.
स्टंटमध्ये साऊथचा सुपरस्टार मानला जातो
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि 70 हजारांपेक्षा याला अधिक लाइक्स मिळाले आहे, तसेच याला 4 लाख 05 हजार 151 पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले.
या व्हिडीओवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, 'फास्ट अँड फ्यूरियस 10 चे स्टंट डायरेक्टर सापडले', तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'फक्त भारतीयच हे करू शकतात.'