Meeting On Zoom : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका ऑफिसच्या झूम मिटिंगमध्ये (Zoom Meeting) एक कर्मचारी हिंदीतून बोलल्याने इतर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला तसंच त्याला इंग्रजीत बोलण्याचं बजावण्यात आलं. हा व्हिडिओ 'घर के कलेश' नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सने हिंदी (Hindi) आपली राष्ट्र भाषा आहे, इंग्रजी बोलण्याचं आग्रह चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. तर काही युजर्सने हिंदीत बोलणाऱ्या कर्मचाऱ्याने ऑफिसचे नियम तोडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काही कर्मचारी झूम मिटिंगद्वारे एकमेकांना जोडले गेल्याचं दिसंतय. हे सर्व कर्मचारी नव्या वर्षाचा प्लान बनवताना दिसतायत. मीटिंग सुरु असतानाच एका कर्मचाऱ्याने हिंदीतून बोलण्यास सुरुवात केली. यावरुन इतर कर्मचारी आक्षेप घेत त्याला हिंदीत बोलण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचं दिसतंय.


ऑफिस कर्मचाऱ्यांमध्ये वाद
अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत कर्मचारी हिंदीत बोलण्यास सुरुवात करताच इतर कर्मचारी आक्षेप घेताना दिसतायत. या कर्मचाऱ्याला इंग्रजीत बोलण्यासाठी आग्रह केला जातोय, कारण इतर कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा समजत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर तो कर्मचारी काही वेळ हिंदीत बोलताना दिसतोय, पण यानंतर पुन्हा तो हिंदी बोलण्यास सुरुवात करतो. पुन्हा हा प्रकार घडल्याने इतर कर्मचारी संतापता आणि लाईव्ह मिटिंगमध्येच भांडण सुरु होतं. या भांडणात मध्यस्थी करत एक दुसरा तरुण आपण हिंदीचं इंग्रजीत भाषांतर करतो असं सांगत भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण संतापलेले इतर कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतंय. इतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या मातृभाषेत बोलण्यास सुरुवात केली. 


व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचंही बोललं जात आहे. पण एक्स अकाऊंटवर शेअर झाल्यापासून हा व्हिडिओ जवळपास एक लाक लोकांनी पाहिला आहे. 'घर के कलेश' नावाच्या पेजवरुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. याव्हिडिओबरोबरच एक कॅप्शनही देण्यात आला आहे. दरम्यान या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, या कर्मचाऱ्यांचा इंग्रजी बोलण्यावर कोणताही आक्षेप नाही, पण हिंदीत बोलल्याने यांनी राईचा पर्वत केलाय.