CCTV Exposed : उत्तर प्रदेशमधल्या आगरामध्ये  (Agra) एका घरातील मोलकरणीचे कारनामे सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाले आहेत. हे कारनामे पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. मोलकरीण घरातील लोकांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या (Sleeping Pills) मिसळायची. जेवल्यानंतर सर्वजण गाढ झोपी जायचे. त्यानंतर मोलकरीण आपला खेळ सुरु करायची. घरच्या सीसीटीव्हीत मोलकरणीचे सर्व कारनामे कैद झाले आहेत. घराच्या स्वंयपाकघरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृष्यात मोकरीण जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळताना दिसली. त्यानंतर तीची पोलखोल झाली. याप्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेशमधल्या आगरा इथं बलदीप सिंह भाटिया हे एक जिम मालक आहेत. त्यांची पत्नी कमलजीत आपल्या दोन मुलांसह राहाते. 2017 मध्ये घरकामासाठी मंजू नावाच्या मोलकरणीला ठेवलं. मध्यंतरी मंजूची तब्येत ठिक नव्हती त्यावेळी भाटिया कुटुंबियांनी तिला आर्थिक मदतही केली. यानंतरही मंजूने भाटिया यांच्याकडचं काम सोडलं.


नोव्हेंबर 2023 मध्ये मंजू पुन्हा भाटिया यांच्याकडे काम मागण्यासाठी आली. तिची आधीची वर्तणूक चांगली असल्याने कमलजीत भाटिया यांनी मंजूला घरकामासाठी ठेवलं. पण त्यानंतर भाटिया कुटुंबाचा रेशानचा खर्च अचानक वाढू लागला. दूध, पीठ, भाज्यांसहित इतर वस्तू लवकर संपू लागल्या. 


अशी झाली पोलखोल
इतकंच नाहीत पती कामाला गेल्यानंतर दुपारी जेवण झालं की कमलजीत आणि दोन्ही लहान मुलं गाढ झोपू लागली. संध्याकाळी उशीरा त्यांना जाग येत होती. त्यामुळे कमलजीत यांना संशय आला. घरात काही तरी विचित्र प्रकार होत असल्याचं त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वयंपाक घर आणि इतर रुममध्ये सीसीटीव्ही लावले. घरात सीसीटीव्ही लावल्याचं मंजूला त्यांनी कळू दिलं नाही.


सीसीटीव्ही पाहून धक्का
सीसीटीव्हीतली दृश्य पाहून कमलजीत यांना धक्का बसला. मोलकरीण मंजू त्यांच्या जेवणात काहीतरी सफेद पावडर मिसळत असल्याचं त्यांना सीसीटीव्हीत दिसलं. सर्व जण बेशुध्द झाले की मंजू घरातील खाण्याचं सामान चोरी करत असे. कमलजीत यांनी तात्काळ याची माहिती पती बलदीप सिंह यांना दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मोलकरीण मंजूला ताब्यात घेतलं.


पोलिसांच्या चौकशी भाटिया कुटुंबाच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळत असल्याचं मजूने कबूल केलं. तसंच घरातील सामान चोरल्याची कबुलीही तीने दिली. पोलिसांनी मंजूला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.