शाळेत मुलगी चांगल्या मार्कने पास झाली, पण टीचरने असा शेरा दिला... वाचून पालकांना घाम फुटला
Teacher Wrote On Report Card: सध्या परिक्षेचा काळा सुरु आहे. काही बोर्डांच्या परीक्षा सुरु आहेत. तर काही बोर्डांच्या परीक्षा संपून निकालही आला आहे. एका शाळेने मुलांचा निकाल दिला, पण त्यावर दिलेला शेरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे
Teacher Wrote On Report Card : निकाल म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्याची (Student) धाकधूक वाढते. पास होणार का? किती मार्क्स मिळतील? टीचर काय शेरा (Remark) देणार? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात काहूर माजवत असतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेतील टीचर्सही रिपोर्ट कार्डवर (Report Card) शेरा लिहितात. यावरुन विद्यार्थ्याची प्रगती किती आहे याचा अंदाज पालकांनाही येतो. सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक रिपोर्ट कार्ड व्हायरल होत आहे. ज्या विद्यार्थिनीचा हा रिपोर्ट कार्ड आहे त्यात परीक्षेत तीने चांगले मार्क्स (Marks) मिळवलेत. पण टीचरच्या (Teacher) अक्षम्य चुकीमुळे त्या विद्यार्थिनीबरोबर पालकही हैराण झालेत.
टीचरचा शेरा वाचून पालक हैराण
व्हायरल होणारा हा रिपोर्ट कार्ड एका विद्यार्थिनीचा आहे. आपल्या वर्गात या मुलीने सातवा क्रमांक मिळवलाय, तसंच सर्व विषयात तीने चांगले मार्क्सही मिळवलेत. यासाठी स्कूल टीचरने तिला प्रोत्साहन देण्यासाठी एक शेरा लिहिला. पण शेरा लिहिताना टीचरकडून मोठी चूक झाली. शेरा लिहिताना She Has Pass (ती उत्तीर्ण झाली) ऐवजी She Has Passed Away (तिचा मृत्यू झाला) असं लिहिण्यात आलं. हे रिपोर्टकार्ड विद्यार्थिनीच्या पालकांच्या हाती पडल्यावर त्यांना धक्काच बसला.
रिपोर्टकार्ड व्हायरल
व्हायरल होणाऱ्या रिपोर्टकार्डवर नजर टाकली तर त्या विद्यार्थिनीचे मार्क्सही कळतील. या मुलीला गणितात 60, इंग्रजीत 52, अॅग्रीकल्चरमध्ये 52, सोशलमध्ये 60, लाईफ स्किलमध्ये 65 आणि आर्ट्समध्ये 80 मार्क्स मिळाले आहेत. पण रिपोर्टकार्डवर शेरा चुकीचा लिहिल्याने हा चर्चेचा विषय झालाय. या रिपोर्टकार्डचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
फोटोवर युजर्सच्या प्रतिक्रिया
रिपोर्टकार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सच्याही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटलंय, शिक्षकाच्या हातून अशी चूक होत असले तर वाईट गोष्ट आहे. एका युजरने म्हटलंय हे रिपोर्टकार्ड खरं आहे की खोटं आहे याबाबत प्रश्न आहे. केवळ व्हायरल करण्यासाठी असं रिपोर्टकार्ड बनवण्यात आलं असावं. आणखी एका युजरने म्हटलंय शिक्षकाच शेरा वाचून विद्यार्थिनीच्या आई-वडिलांना काय वाटलं असेल.