नालंदा: एकीकडे मुलांना मुली लग्नसाठी मिळत नाहीत अशी ओरड सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये एका युवकाला चांगलाच मोठा फटका बसला आहे. एका तरुणाला प्रसाद घ्यायला जाणं चांगलंच महागात पडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीच्या सासरी प्रसादासाठी जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. 


बिहारच्या नालंदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नितीश कुमार नावाच्या तरुणाला जबरदस्तीने पकडून लग्न लावून देण्यात आलं. नितीश बहिणीच्या सासरी गेला होता. तिथे छट पूजेचा प्रसाद घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी ग्रामस्थांचा गैरसमज झाला.


ग्रामस्थांनी नितीशचं अपहरण केलं आणि त्याला बळजबरीनं लग्नासाठी उभं केलं. नितीशचा जबरदस्तीनं विवाह करण्यात आला. या प्रकरणी पीडित तरुणाने नालंदा इथल्या मानपूर पोलीस ठाण्यात तक्रर दाखल केली आहे. 


11 नोव्हेंबर रोजी छट पूजेचा प्रसाद घेण्यासाठी बहिणीच्या सासरी पीडित तरुण आला होता. प्रसाद देऊन पुन्हा घरी जात असताना गावातील काही लोकांनी त्याला मारहाण केली. त्याचं अपहरण केलं. 


दुसऱ्या दिवशी या तरुणाचं त्यांनी बळजबरीनं लग्न लावून दिलं. पकडौवा विवाह अशी एक प्रथा तिथल्या आसपासच्या काही गावांमध्ये आहे. 


याा परंपरेनुसार चांगल्या घरातील किंवा शिक्षित मुलांचं अपहरण करून त्यांचा गावातील मुलींशी बळजबरीनं विवाह केला जातो. अशा प्रकारचे विवाह पूर्वी खूप होत असतं. मात्र आता त्याचं प्रमाण कमी झालं आहे. काही ठिकाणी आजही ही परंपरा आहे. 


या प्रकरणी आता पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे. मात्र पोलिसांकडून पुढील तपासाची कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही.