मुंबई : आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार आणि त्यांच्या कला समोर येत असतात, जे पाहूण आपण भारावून जातो. काही कलाकारांच्या कला खरंच अशा असतात जे या जगात दुसरं कोणीही करु शकत नाही, आणि आपल्याला त्याचं नवल ही वाटतं. अशाच एका कलाकाराने त्याची कला दाखवली आहे. जी पाहूण तुम्हाला विश्वासच बसणार नाही की, असं ही काही असू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाबलो पीकासो (Pablo Picasso)या प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार,आणि थेटर डिझायनर तुम्हाला माहितीच असेल, ज्याचे अनेक पेन्टींग लाखो ते कोटी रुपयांपर्यंत विकले गेले आहेत. परंतू तुम्ही पीगकासो (pigcasso)ला ओळखता का?


पीगकासो (pigcasso) हा आफ्रिकेत राहणारा 4 वर्षाचा डुकर आहे. ज्याला पेन्टींग करायची आवड आहे. हा तोंडात ब्रश घेऊन पेन्टींग करतो. आणि याच त्याच्या कलेमुळे तो जगातील पहिला असा प्राणी आहे जो आपल्या कलेमुळे  50 लाख 23 हजार रुपयांचा मालक आहे. या डुकराच्या पेन्टींगस ची किंमत जवळ जवळ पाबलो पीकासो (Pablo Picasso)च्या पेन्टींग इतकेच आहे आणि त्यामुळेच त्याला पीगकासो (pigcasso)हे नाव पडले आहे.



तुम्ही त्याची  पेन्टींग पाहा. तो सगळ्या पेन्टींग आगदी काही मिनिटांतच पूर्ण करतो. त्याने सध्या काढलेली एक  पेन्टींग सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. कारण त्याने ही पेन्टींग ब्रिटनच्या प्रिंस हॅरी (Prince Harry) ची काढली आहे.



जी एका स्पेनच्या व्यक्तीने 2 लाख 36 हजाराला विकत घेतली आहे. या आधी पीगकासो (pigcasso)ने  ब्रिटेनची महारानी एलिजाबेथ (Queen Elizabeth) यांची पेन्टींग काढली होती जी 2 लाखाला विकली गेली आहे.



कदाचीत तुम्ही आम्ही केलंलं पेन्टींग हजार रुपयात देखिल कोणी घेण्याचा विचार करणार नाही. पण एका डुकराने केलेली ही पेन्टींग चक्क 2 लाख 36 हजाराला विकली गेली आहे. नक्की  वेगळ असं काय आसावं या  पेन्टींगमध्ये हे तर यामधले कला प्रेमी आणि तज्ञच सांगू शकतात.