Viral Video :  व्हायरल पोलखोल (Viral Polkhol) या कार्यक्रमात आज आपण नवा व्हीडिओ पाहणार आहोत. तुम्ही घरात एकटे असाल आणि तुमच्याकडे कुणी पाणी मागत असेल तर सावध व्हा. पाणी मागण्याच्या बहाण्यानं चोरटा तुमच्या दारात उभा असू शकतो. हे आम्ही का म्हणतोय ते संपूर्ण बातमी पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल. नक्की असं काय घडलंय हे सविस्तर जाणून घेऊयात. (viral polkhol fact check beware those who are alone at home)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ पाहा आणि घरी एकटं असल्यास सावधगिरी बाळगा. हा दरवाज्यात उभा असलेला हा चोर आहे. आता या व्हिडिओत पाहा, हा चोरटा दरवाज्याजवळ उभा आहे. याने दरवाजा ठोठावला आणि महिलेकडे पाणी मागितलं. महिलेनंही याला ग्लासमधून पाणी दिलं. पाणी प्यायला. पण, तो घात घालून बसल्यानं त्याचं एका ग्लासनं भागलं नाही. त्यानं पुन्हा पाण्याची मागणी केली. महिलेनंही दया दाखवून याला पुन्हा ग्लासमधून पाणी आणून दिलं. 



यावेळी मात्र, त्यानं डाव साधला. महिला घरात जातानाच त्यानं तिचा गळा दाबला आणि घरात शिरण्याचा प्रयत्न केला. महिलेनं जोरजोरात आरडा ओरडा केला. पण, याने महिलेला घरात खेचून दरवाजा बंद केला. यावेळी याचे दोन साथीदारही बाहेरून धावत आले. महिलेचा आवाज ऐकून बाजूवाल्यांनी दरवाजा उघडला. पण, त्यांनी पुढे जाण्याचं धाडस केलं नाही. 


महिला मदतीसाठी हाक मारत असतानाही शेजाऱ्यांनी दरवाजा बंद करून घेतला. काही वेळातच हे तिघे चोरटे चोरी करून पळून गेले .महिलेनं यांचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओ कुठला आहे ते कळू शकलेलं नाही. मात्र, अशी अनोळखी व्यक्ती दरवाज्यात आली तर सावधगिरी बाळगा.