Fact Check : तुम्ही कधी खाल्लंय न वितळणारं आईस्क्रीम?
बातमी आहे एका (Ice Cream) आईस्क्रीमची. तुम्ही कधी आगीतही न वितळणारं आईस्क्रीम खाल्लंय का?
मुंबई : बातमी आहे एका (Ice Cream) आईस्क्रीमची. तुम्ही कधी आगीतही न वितळणारं आईस्क्रीम खाल्लंय का? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.पण, हे आईस्क्रीम नक्की आहे तरी कसं? चला पाहुयात (viral polkhol fact check ice cream burn know what truth what false)
आईस्क्रीमला आग लावली तरी हे वितळत नाहीये. बघा, या आईस्क्रीमला लाईटरने पेटवण्याचा प्रयत्न केला तरीदेखील आईस्क्रीम आहे तसंच दिसतंय. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण, हे आईस्क्रीम असल्याचा दावा करण्यात आलाय.
आम्हालाही याबद्दल शंका वाटली. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. आईस्क्रीम कसं काय वितळत नाही? हे पाहण्यासाठी आम्ही पडताळणी केली. असं कोणतं आईस्क्रीम आहे का? याबाबत माहिती शोधली. त्यावेळी काय माहिती समोर आली पाहा.
आग लागूनही न वितळणारं आईस्क्रीम आहे. चीनमध्ये असं आईस्क्रीम मिळतं. न वितळणारं आईस्क्रीम 656 रुपयांना मिळालं. आईस्क्रीममध्ये कॅरेजेनन गम वापरलंय. कॅरेजेनन गम दुधातील प्रोटीनचं प्रमाण कायम राखतं.
या आईस्क्रीमला 88 डिग्री फारेनहाईड तापमानात ठेवलं...तरीदेखील हे आईस्क्रीम वितळलं नाही चीनमध्ये अनेकजण हे आईस्क्रीम विकतही घेतात. पण, याला वितळण्यासाठी अनेक तास वाट पाहावी लागते. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा व्हायरल व्हिडिओ सत्य ठरलाय.