Viral Video : व्हीडिओ आहे एका भीषण (Bus Accident) अपघाताचा. एक कुटुंब रक्षाबंधनासाठी (Rasha Bandhan 2022) चाललं होतं. गाडीची वाट पाहत रस्त्याच्या बाजूला उभं होतं. एक दोन गाड्या समोरून गेल्या पण, त्यांना नकार दिला. त्यानंतर मागून बस आली. पण, त्यांच्यासाठी काळ बनून. असं काय घडलं यांच्यासोबत, चला पाहूयात. (viral polkhol fact check vadodara gujrat bus accident)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अख्खं कुटुंब रक्षाबंधनासाठी जायाला बसची वाट पाहत होतं. बराच वेळ झाला. यांना गाडी मिळेना. रिक्षाला हात दाखवला, पण रिक्षावाल्यानं जाण्यास नकार दिला. या रिक्षावाल्यानं यांना नेलं असतं तर यांच्यावरचं मोठं संकट टळलं असतं. आता हे आम्ही का म्हणतोय ते नीट पाहा.


6 जण मोठे आणि 2 चिमुकली मुलं इथे दिसतायत. दिसेल त्या गाडीला हे हात दाखवतायत. एक रिक्षा आणि एक गाडी यांच्या समोरून गेली आणि मागून बस आली. 



बस थांबवण्यासाठी यांनी हात दाखवला पण, यावेळीच बसचालकाचं नियंत्रण सुटलं आणि याने यांना जोरात धडक दिली. आता पुन्हा एकदा पाहा, किती भीषण अपघात घडलाय. दोन मुलांना आणि एका व्यक्तीला या बसनं जोरात धडक दिली. यावेळी ही महिला थोडक्यात बचावली. या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. 


तर दोन लहान मुलांनाही बसची धडक लागली. जोरात दिलेल्या धडकेनं मुलंही जखमी झाली. हा भयानक अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय. ही घटना गुजरातच्या गोध्रा-बडोदा महामार्गावर घडलीय. जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. पण, हा काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.