लग्न मंडपात गोळीबार करणारी रिवॉल्वर राणी मुंबईतील? लग्नात नवऱ्यासमोरच झाडल्या 4 गोळ्या
गोळीबार मारामारी किंवा शूटआऊटमध्ये नव्हे तर लग्नमंडपात झाला आहे. रिवॉल्वर राणी...याच रिवॉल्वर राणीनं भर लग्नमंडपात गोळीबार केला...दोघा नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला
एक...दोन...तीन...चार...तब्बल चारवेळा गोळीबार झाला. हा गोळीबार मारामारी किंवा शूटआऊटमध्ये नव्हे तर लग्नमंडपात झाला आहे. रिवॉल्वर राणी...याच रिवॉल्वर राणीनं भर लग्नमंडपात गोळीबार केला...दोघा नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला...त्यानंतर दोघेही जाऊन नवरा नवरीच्या खुर्चीवर बसले.
नवरीच्याच बाजूला काळा शर्ट घातलेला तरूण तिच्या शेजारी येतो आणि तिच्या हातात पिस्तूल देतो. ही पिस्तूल घेऊन भर लग्नमंडपात नववधू चार राऊंड फायरींग करते.यावेळी तिचा नवरा शेजारी बसलेला असतो.राऊंड फायर करताच नवऱ्यान नवरीचा एवढा धसका घेतला की, त्यानं तिच्याकडे पाहण्यासाठी साधी मानही वळवली नाही.
ही रिवॉल्वर राणी मुंबईमधील?
हा व्हिडिओ मुंबईतला असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, फायरिंग करणारी ही नवरी कोण आहे...? लग्नात वापरली गेलेली पिस्तूल नेमकी कोणाची आहे?. रिल्स बनवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी केली.
काय सत्य आलं समोर?
हा व्हिडिओ मुंबईतला नाही
गोळीबार करणारी नवरी उत्तर प्रदेशच्या हाथरसची
नवरीच्या हातात पिस्तूल देणारा तिच्या गावातला मुलगा
गोळीबार केल्याप्रकरणी तक्रार दाखल
हा व्हिडिओ मुंबईतील नसल्याचं समोर आलंय...मात्र, अशा प्रकारे भर लग्नसमारंभात गोळीबार करणं कुणाच्याही जीवावर बेतू शकतं. त्यामुळे असलं जीवघेणं धाडस करू नका.