Snake Viral Video : सापाचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. सापाच्या एका दंशाने आपण मृत्यूचा दारात पोहोचतो. जंगल आणि जंगल परिसरातील गावांमध्ये विषारी साप, अजगर, नाग सर्रास दिसतात. साप हे विषारी आणि बिनविषारी असतात. पण लोकांना तो दिसला की मग सापाची पण काही खैर नसते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. कधी साप दुचाकीतून निघतो तर कधी हेल्मेटमध्ये दडलेला असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यतरी सापाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात साप एका महिलेची चप्पल घेऊन फरार होतो. सापाचे अनेक व्हिडीओ रोज अगदी प्रत्येक क्षणाला व्हायरल होतात असं म्हणं पण वावग ठरणार नाही. पण तुम्ही सापाच्या रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ कधी पाहिला आहे का?  (viral Snake video man rescue snake from pipe Shocking video Trending on Internet )


सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. तो व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त यूजर्सने पाहिला आहे. तुम्ही पाहिला आहे का हा व्हिडीओ? काय आहे असं या व्हिडीओमध्ये...तर आम्ही सांगतो तुम्हाला एक भलामोठा साप एका पाईपमध्ये अडकला होता. एका तरुणाने रेस्क्यू करुन सापाचा बचाल केला. 


तरुणाने ज्या हिम्मतीने आणि हाताने न घाबरता पाईपातून सापाची सुटका केली. हा सगळ्या थरार या व्हिडीओमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता काळा जीन्स पॅन्ट आणि निळा, पांढऱ्या रंगाची टीशर्ट घातलेला तरुण हाताने हो हाताने घराच्या मागील बाजूस मैदानात पाण्याचा एका पाईपमधून साप काढताना दिसत आहे. 


या व्हिडीओमध्ये पाहू शकता त्या पाईपातून पाणी बाहेर येतं आहे आणि सापाची फक्त शेपटी दिसतं आहे. त्या तरुणाने शेपटीला पकडून त्या सापाची पाइपातून मुक्तता केली. 



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवरील Susanta Nanda या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.