नवी दिल्ली : तुम्हालाही 'बचपन का प्यार' हवं आहे का, मग इथं या.... ही जाहिरात काहीशी विचित्र वाटतेय का? तसं वाटण्याची गरज नाही. कारण , बचपन का प्यार घ्यायला जाणाऱ्या तुम्हाला कोणीही वेगळ्या नजरेतून पाहणार नाही. अहो थांबा थांबा... विचारांचं घोडं वाट चुकत असेल तर जरा त्याला थांबवा आणि हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे एकदा पाहून तरी घ्या... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बचपन का प्यार' (bachpan ka pyar), 'बसपन का प्यार' ही गाणी किंवा हे एक गाणं आणि त्याचे अनेक वर्जन सोशल मीडियाव मागच्या काही दिवसांमध्ये तुफान व्हायरल झाले. सर्वप्रथम आपल्याच शैलीत गाणं गाणारा चिमुकला सहदेव देशभरात लोकप्रिय झाला, आणि या गाण्याचे मुळ कलाकारही प्रकाशझोतात आले. या गाण्याच्या निमित्तानं अनेकांना थेट त्यांच्या बचपन का प्यार, अर्थात 'ती' खास व्यक्तीही आठवली. आता म्हणे थेट एका मिठाईच्या रुपात हे 'बचपन का प्यार' तुमच्या भेटीला आलं आहे. 


गुजरातमधील सुरत येथे एका मिठाईच्या दुकानात या गोड पदार्थाची विक्री केली जात आहे. 24 carats असं नाव असणाऱ्या या मिठाईचं दुकान राधा मिठाईवाला चालवतात. रक्षाबंधन जवळच असल्यामुळं या सणाचं औचित्य साधत लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून हा सारा घाट. या मिठाईचं नावच आगळंवेगळं नसून त्याची चवही तितकीच आगळीवेगळी आहे. 



एक काळ होता, जेव्हा लहान मुलांना बबलगम फार आवडायचा. हेच फ्लेवर इथं वापरण्यात आलं आहे. या दुकानात येणाऱ्या ग्राहकांनाही या मिठाईचं आणि अर्थातच बचपन का प्यार या गाण्याचं कौतुक वाटत आहे.