Coconut tea making: आपल्याकडे काही लोक असे आहेत ज्यांच्या दिवसाची सुरवात चहाशिवाय होतच नाही, सकाळी चहा घेतला नाही तर संपूर्ण दिवस खराब जाईल असं म्हणणारी बरीच चहाप्रेमी मंडळी आहेत. (chai lovers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहाचे विविध प्रकार गल्लोगल्ली आपल्याला दिसतील. तुम्ही सुद्धा आजपर्यंत बऱ्याच प्रकारचे चहा प्यायले असाल, थंडीच्या दिवसात गरमागरम चहा प्यायची मजाच काही और असते..(tea making)


मधल्या काळात कुल्हड चहा फारच प्रसिद्ध होता, मातीचा कुल्ह्ड (trending kulhad chai) जाळात भाजायचा त्यात चहा ओतायचा मग तो फेसाळलेला चहा आणि त्यात मिक्स झालेला मातीचा फ्लेवर अहाहा ! सगळीकडे या चहाची फार क्रेझ होती, गल्लोगल्ली प्रत्येक नाक्यावर आपल्याला एकतरी कुल्ह्ड चहावाला दिसायचाच. 


पण आता मार्केटमध्ये एक नवीन चहा आलेला आहे हा चहा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला हरकत नाही. 


नारळाच्या करवंटीत बनवलेला चहा तुम्ही प्यायला आहे का ? नसेल तर एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही.  नारळाच्या करवंटीतला चहा करायला सोपा तितकाच कडक, चविष्ट सुद्धा लागतो. चला तर मग जाणून घेउया नारळाच्या करवंटीतला कडक चवदार कोकोनट चहा. (tea making in coconut shell)


प्रत्येकाच्या घरी नारळ असतोच साधारणतः नारळ फोडला कि आपण करवंटी फेकून देतो. त्यात चहा करून प्यायची आयडियाची कल्पना एका अवलियाला सुचली आणि पाहता पाहता हा व्हिडीओ आणि रेसिपी खूप प्रसिद्ध झाली. यासाठी नारळाची एक करवंटी पुरेशी आहे. घरात एवढी भांडी असताना नारळाच्या करवंटीत चहा का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर उत्तर एकच ते म्हणजे हौस ! हौसेला मोल नसत असं म्हणतात ते उगीच नाही. 


चला तर मग जाणून घेऊया चहाची आगळी वेगळी रेसिपी


नारळाच्या करवंटीत चहा कसा करायचा?


गॅस वर नारळाची एक रिकामी करवंटी ठेऊन द्या, ती साधारण गरम झाली कि त्यात पाणी घाला पाणी उकळू लागल्यावर त्यात आलं किसून घाला मग एक कप दूध घाला मग त्यात चहा पावडर घाला आणि मग शेवटी चवीप्रमाणे साखर घाला किंवा तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता.  काही मिनिट उकळा आणि तुमचा कोकोनट टी बनून तयार. 



मग कशी वाटली कोकोनट टी ची भन्नाट रेसिपी, तुम्हीही हा हटके चहा एकदा नक्की करून पाहा.