नल्लोर : भारतात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लंग्न पाहिले असणार. त्यामध्ये प्रत्येक जण आप-आपल्या ऐपती प्रमाणे लग्न करतो. तर काही वेळेला लोकं मोठेपणा करत आपल्या ऐपती बाहेर ही लग्न करतात. लग्नात आवाजवी खर्च करतात. पंरतु खरचं लग्नात एवढा खर्च करण्याची गरज आहे का? असो... आपले लग्न कसे करावे हे ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु सध्या एका लग्नाची आणि लग्नात उपस्थित राहिलेल्या पाहूण्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या मागचे कारणही तसेच आहे, असे लग्न आणि असे प्रमुख पाहूणे कोणाच्या ही लग्नाला आले नसावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अनोख्या लग्नाचा व्हीडिओ बिजनेसमॅन हर्ष गोयंका (Businessman Harsh Goenka)यांनी शेअर केला आहे. ज्यामुळे हे लग्न आणि त्यातील पाहूणे हे चर्चेचा विषय बनले आहेत.


हे लग्न आंध्र प्रदेश येथील नल्लोर शहरातील निखिल आणि रक्षा नावाच्या जोडप्याचे आहे. ज्यांनी त्यांच्या लग्नात प्रमुख पाहूणे म्हणून गायी, म्हशी, माकडं, सासे आणि पक्षीं यांना आमंत्रीत केले होते. ज्यांच्या जेवणाची उत्तम सोय देखील केली गेली होती.


तुम्ही व्हीडिओमध्ये पाहू शकता की, कसे सुंदर पद्धतीने सजवून या सगळ्या प्राण्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ जेवणात वाढले जात आहे. या जेवणात चारा, फळं, भाज्या, दूध इत्यादी गोष्टीचा समावेश आहे. जे हे प्राणी सुद्धा अगदी आनंदाने या लग्नाच्या जेवणाची मजा घेत आहेत.


एक मिनिटांच्या या व्हीडिओने अनेक लोकांची मने जिंकली आहेत. बिजनेसमॅन हर्ष गोयंका (Businessman Harsh Goenka)यांनी या व्हीडिओला सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत लिहिले की, 'नेल्लोर च्या एक गोशालेत हे लग्न पार पडले आहे. जिथे फक्त प्राणी आणि पक्ष्यांनाच आमंत्रण दिले गेले आहे आणि या लग्नात पशु-पक्ष्यांकडून आशिर्वाद घेण्यासाठी यांनी वधू-वराने किती सुंदर योजना आखली आहे.'



या व्हीडिओला आतापर्यंत 40 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर, 581 युझर्सने रीट्वीट केले आहे आणि त्याला 3 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.