VIRAL : आपल्याला स्ट्रीट फूड (Street Food) खायला फार आवडतं. अनेकदा मित्रमैत्रिणींसोबतही कधीतरी विकेंडला नाहीतर कॉलेज संपल्यावर, पिक्चर पाहून झाल्यावर स्ट्रीट फूड खावंस वाटतंच वाटतं. त्यातून समोसे हे आपण कायमच आवडीनं खातो. त्यातून गरमागरम समोसे (Samosa Fraud) आणि त्याचसोबत चटणी हे आपल्या सर्वांचेच आवडीचे पदार्थ. परंतु माध्यमातून आणि इंटरनेटवरून आपण कायमच पाहतो की, हेच स्ट्रीट फूड (Street Food) अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं तयारही केले जाते. अशा पद्धतीनं तयार केले जाते की कदाचित तुम्हाला असे व्हिडीओजही पाहवणार नाही, असे व्हिडीओज हे अनेकदा व्हायरल होत असतात. त्यामुळे पाहणाऱ्यांना कायमच पुन्हा कुठेही रस्त्यावरील जेवणं खाण्याची भितीचं वाटते. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो (Viral Samosa) आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक समोसा विक्रेता चक्क एका भांड्यातून बटाटे कुसकरताना दिसतो आहे. त्यातून त्यानं एक घाणेरडी चप्पलही घातलेली पाहायला मिळते आहे. आपल्या इथे कोणीही स्वच्छता पाळताना दिसत नाही. त्यामुळे याचा पुन्हा एकदा एक भीषण नमुना समोर आला आहे. अनेकदा अनेक लोकं शॉर्टकट वापरताना दिसतात आणि लोकांच्या जीवाशी खेळताना दिसतात. असा एक प्रकार आता या व्हिडीओतून समोर आला आहे. 


आपल्याकडे आता चांगल्या मशीननरी तयार झालेल्या असल्या तरी विक्रेते मात्र अत्यंत घाणरेड्या पद्धतीनं समोस्यांसाठी बटाटे रगडताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा लोकांची झोप उडाली आहे. यापुर्वीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा हा व्हिडीओ पाहून लोकं पुन्हा एकदा घाबरे घुबरे झाले आहे. हा समोसे (Patoto Smashed Using Chhapal) बनवणारे विक्रेता आपल्या किचनमध्ये बटाटे कुसकरण्यासाठी रोज घाणेरडी चप्पल घालून बटाटे कुसकरता दिसतो आहे. त्यातून तो ते जोरजोरात रगडताना दिसतो आहे आणि त्याचसोबतच भिंतीला हात टकवून हा इसम जोरात बटाटे कुस्करताना जोर लावताना दिसतो आहे. 


परंतु लोकांना मात्र त्याचे हे कौर कृत्य माहिती नव्हते आणि त्यातून या विक्रेत्याच्या दुकानावर चक्क 500 ग्राहक तरी हे समोसे खायला दुकानावर येयतात ही एक धक्कादायक बाब आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ (Video) सगळ्यांचाच थरकाप उडवणारा आहे. तुम्ही जर या दुकानातून समोसे खाल्ले असतील तर तुमच्यासाठी ही बातमी फारच धक्का देणारी आहे. कारण येथे अनेक लोकं इथल्या समोस्यांचे कौतुकही करताना दिसतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओवर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. यामध्ये लिहिलंय की, अरे, करोना तर काहीच नाही खरा व्हायरल तर या लोकांचाच आहे. यासाठी काही ट्रोलर्सनी पंतप्रधानांकडेही याकडे लक्ष द्यावे असे सांगितले आहे. तर ट्रोलर्सनी (Trollers) असेच काही व्हिडीओ आणि खरं बाहेर येयला पाहिजे म्हणजे लोकं जागृत होतील.