Parrot Viral Video on Social Media : कोणताही प्राणी किंवा पक्षी यांचं जीवन हे मनुष्यापेक्षा ही आव्हानात्मक असतं. मनुष्याकडे विचार करण्याची शक्ती आहे. पण प्राणी आणि पक्षी यांच्यात ती शक्ती नसते. तरी देखील ते अनेक गोष्टी आपल्यापेक्षा उत्तमरित्या करतात. पक्षी किंवा प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या पोपटाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये पोपट आपल्या साथीदाराची वाट पाहत आहे. त्यानंतर तिथे त्याची मैत्रिण येते. त्यानंतर दोघांमध्ये सांकेतिक भाषेत संभाषण होते. यानंतर पोपट त्याच्या मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी नाचू लागतो. पोपटाचे हे रूप पाहण्यासारखे आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचं ही मनोरंजन होईल.



सोशल मीडियावर पोपटाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा गोंडस आणि मजेदार व्हिडिओ भारतीय वन सेवा, IFS चे डॉ. सम्राट गौडा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 13 हजाराहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स खूश झाले आहेत.