बंगळुरु :कोरानामुळे सगळेच लोकं घरी असल्याने आपल्या शरीराला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी लोकांचा कल जिम आणि व्यायामकडे वाढला आहे. सुरूवातीला जिम बंद होत्या, परंतु आता काही ठिकाणी त्या सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे तरुण मंडळी आता जिमकडे वळले आहेत. तुम्हाला हे माहितच आहे की, जिम किंवा व्यायाम केल्याने शरीर निरोगी होते आणि शरीराच्या समस्या ही कमी होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल माडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे सगळ्याच तरुण मंडळींना धक्का बसला आहे. 2 मिनिटांचा हा CCTV व्हिडीओ तुम्हाला थक्क करुन सोडतो.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण जिममधून बाहेर येऊन पायऱ्यांवरती बसतो. त्याला छातीत थोडे दुखू लागते, ज्यामुळे तो हळूहळू पाणी पितो आणि नंतर पुन्हा उभा राहून छाती दाबण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरीही त्याला कसे तरी होत असते, म्हणून तो पुन्हा खाली बसतो आणि पाणी पितो.


नंतर तो पुन्हा उठून आत जिममध्ये जातो. परंतु काही सेकंदानंतर तो पुन्हा जिमच्या बाहेर येतो आणि पायऱ्यांवर पुन्हा बसून हळूहळू श्वास घेण्याचा प्रयत्न करतो, पण अखेर त्याच्या वेदना वाढतात आणि तो पायऱ्यांवरुन खाली कोसळतो. हा व्हायरल होणारा व्हिडीओ बंगळूरचा असल्याचे समोर आले आहे.


अभिनेता सिद्धार्थ शुकलाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर या एक तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हार्ट अटॅकमुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यू देखील हार्ट अटॅकने झाल्यामुळे लोकांच्या मनात आता असे प्रश्न उपस्थीत राहू लागले आहेत की, हेल्दी लाइफ स्टाईल जगणाऱ्या आणि कमी वयाच्या तरुणांमध्ये देखील हृदयाचे आजार वाढू लागले आहे.


त्यामुळे लोकं आता घाबरले आहेत. परंतु घाबरुन जाण्याचे कारण नाही. योग्य आहार आणि प्रमाणात जिम केल्याने तुमचे काहीही नुकसान होणार नाही. जिममध्ये जास्त प्रामाणात व्यायाम केल्याने आणि मेंटल तणावात जिम केल्याने असे घडू शकते.


 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बऱ्याच तरुणांचा असा समज असतो की, जास्त व्यायाम केल्याने त्यांना त्याचा जास्त फायदा होईल. लोकं लवकर वजन कमी करण्यासाठी किंवा लवकर चांगली बॉडी बनवण्यासाठी जास्त व्यायाम करतात. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमीच धोकादायक असते. त्यामुळे अती व्यायाम जीवावरही बेतू शकतो. म्हणून या व्हिडीओला एक उदाहरण म्हणून घ्या आणि गोष्टींचा अतिरेक टाळा.