Traffic सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलाला तीने जवळ ओढलं आणि... या व्हिडिओचं `का` होतंय कौतुक
Viral Video : सोशल मीडिआवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ मनला भिडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांनी व्हिडिओतल्या महिलेचं कौतुक केलं आहे.
Viral Video : प्रवासात आपल्या अनेकदा सिग्नलवर (Signal) किंवा टोलनाक्यावर लहान-लहान मुलं भीक (Begger) मागताना दिसतात. आपण अनेकवेळा या मुलांकडे दुर्लक्ष करतो किंवा सुट्टे पैसे देऊन पुढे निघून जातो. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिलेने सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलाबरोबर जे केल ते पाहून सर्वत्र तीचं कौतुक होत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत
हा व्हिडिओ ट्विटरवर एका युजरने शेअर केला आहे. एक महिला दुचाकीवर मागे बसली आहे. तिच्या डोक्यावर हेल्मेही आहे. दुचाकी एका सिग्नलवर येऊन थांबते. त्याचवेळी एक लहान मुलगा तिच्या जवळ येऊन पैसे मागू लागतो. दुचाकीवर बसलेली महिला त्या लहान मुलाला जवळ ओढते आणि त्याची आस्थेने चौकशी करते. कदाचित त्याच्या डोळ्याला दुखापत झाली असल्याने ती महिला त्याचे डोळेही तपासते. एक आई आपल्या पोटच्या मुलाला ज्या पद्धतीने प्रेमाने कुरवाळते. त्याचप्रमाणे ती महिला भीक मागणाऱ्या त्या मुलाचे लाड करताना व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर त्या मुलाला तीने पैसेही दिले.
मोबाईलमध्ये केलं शूट
ही संपूर्ण घटना त्या महिलेच्या दुचाकीमागे असलेल्या एका वाहनातील व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केली आहे. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्या महिलेचं कौतुक करत तिला सलाम केला आहे.
बीटेक करुन बनली उबेर चालक
दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक मुलीचं कौतुक होतंय. कोलकातामधल्या या मुलीचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा ठरतोय. फेसबुकवर परम कल्याण सिंह नावाच्या एका युजरने एक पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये कोलकाताची महिला उबेर चालक दीप्ता घोषच्या (Dipta Ghosh) संघर्षाची कहाणी मांडण्यात आली आहे. दीप्ता घोषने इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केलंय. शिक्षण सुरु असतानाच 2020 मध्ये दीप्ताच्या वडिलांचा मृत्यू झाला.
आईची आणि लहान बहिणीची जबाबदारी दीप्तावर येऊन पडली. तिला काही कंपन्यांमधून नोकरीची ऑफर आली. पण त्या सर्व नोकऱ्या कोलकाताच्या बाहेर होत्या. पण आई आणि बहिणीमुळे तिला त्या नोकऱ्यांवर पाणी सोडावं लागलं. शेवटी तीने कॅब चालवायचा निर्णय घेतला. यासाठी तीने कमर्शियल ड्राईव्हिंग लायसन्स काढलं. बँकेतून तीने कर्ज काढत ऑल्टो कार खरेदी केली आणि 2021 पासून तीने उबेरसाठी नोकरी सुरु केली. आज दररोज ती 6 ते 7 तास कॅब चालवते आणि दिवसाला 40 हजारांची कमाई करते.