मुंबई : सोशल मीडिया हे इंटरनेटवरील सर्वात मजेदार व्यासपीठ आहे. इथे कधी काय पहायला किंवा ऐकायला मिळेल याचा काही नेम नाही. इथे लोक प्रसिद्ध होण्यासाठी तसेच, जास्त व्ह्युव्ज आणि लाईक्ससाठी काही वाटेल ते करण्याची तयारी दाखवतात. वेगवेगळ्या कंटेन्टचे व्हिडीओ लोक बनवून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करतात. परंतु कोणतीही गोष्ट लगेच एका प्रयत्नात होईलच असे नाही. यासाठी लोकांना बऱ्याचवेळा प्रयत्न करावे लागतात. असंच काहीसं या मुलांसोबत देखील घडलं आहे. ज्यामुळे या मुलाचं सर्वांसमोर हस्य झालं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला त्याच्या परिस्थीतीवर हसावं की, दुखं व्यक्त करावं हे कळणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ एका मुलाशी संबंधित आहे जो दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर रील व्हिडीओ बनवत आहे. मात्र, यादरम्यान त्याच्यासोबत असे काही घडले की, तो कधीही आयुष्यात विसरणार नाही.


हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि 50 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक देखील केले आहे. समोर आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये हा मुलगा सिग्नेचर ब्रिजजवळ रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच तो कॅमेराच्यामधोमध येतो आणि गाण्याचा ताल धरुन आपला शर्ट काढतो आणि हवेत उडवतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


परंतु त्याच दरम्यान बाजूने जाणाऱ्या एका बाईकवरील व्यक्तीने तो शर्ट हवेतुनच झेलला आणि तेथून निघून गेला. ज्यानंतर हा रिल्स बनवणारा व्यक्ती आपला शर्ट शोधू लागला परंतु तो त्याला काही मिळाला नाही आणि तो आपला शर्ट हवेत कुठे गायब झाला याचा विचार करु लागला.


या घटनेनंतर या मुलाला काय करावं हेच सुचत नाहीय, त्याची ही परिस्थिती पाहून लोकांना फारच हसू येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.