मुंबई : सोशल मीडिया एक अस प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर दररोज आपल्या वेगवेगळ्या भागातून आणि वेगवेगळ्या लोकांकडून टाकलेले व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की, ज्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांना पाहायला मिळतात. तसेच आपल्या देशात अनेक ठिकाणी अंधश्रद्धा मानल्या जातात आणि त्यासंदर्भातील अनेक व्हिडाओ देखील आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीड्यावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल आणि हा प्रकार पाहून राग देखील येईल. कारण या व्हिडीओमध्ये उकळत्या पाण्यात एका लहान मुलाला बसवली आहे.


हात जोडून कढईत बसला मुलगा


सोशल मीडिया साईट ट्विटरवर व्हायरल होणारे अनेक व्हिडिओ खूपच धक्कादायक आहेत. काही वेळा हे असे व्हिडीओ तुम्ही पाहू देखील शकत नाही इतके ते भयानक असतात.


संदीप बिष्ट नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या अकाऊंटवर लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा लहान मुलगा एका उकळत्या पाण्याच्या कढईत बसला आहे. तुम्हाला हे पाहून आश्चर्यवाटेल की, उकळत्या पाण्यात बसून सुद्धा या मुलाला काहीच वेदना होत नाहीत. तो शांतपणे या कढईत बसला आहे आणि त्याने आपले हात जोडले आहेत आणि तो काहीतरी मंत्राचा जप करताना तुम्ही पाहू शकता.


लाखो लोकांनी प्रश्न उपस्थित केले?


या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आगीच्या ज्वाळा पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. परंतु असे होणे शक्य नाही, इतक्या भयावह परिस्थितीत हा मुलगा असा शांत बसूच शकत नाही. त्यामुळे काही लोकांना हा व्हिडीओ बनावट वाटत आहे, तर काहीजण याला खूप जुना असल्याचे सांगत आहे.


परंतु काहीही असलं तरी हे असं होणं शक्य नाही. आपण 21 व्या शतकात राहातो त्यामुळे या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे कठीण आहे. हा व्हिडीओ कुठल्या भागातील आहे किंवा हा कधीचा आहे? अजून तरी या व्हिडीओमागचं सत्य समोर आलेलं नाही, परंतु यासाठी सायन्स ट्रिकचा वापर केला गेला असावा असं काही लोकांच म्हणणं आहे.



हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं खूप रागावली आहेत आणि ते स्वत:ला या व्हिडीओवर कमेंट्स करण्यापासून थांबवू शकले नाही आणि लोकांनी मोठ्या संख्येनं या व्हिडीओवर कमेंट्स केल्या. आतापर्यंत 2800 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रीट्वीट केला आहे आणि 9500 हून अधिक वापरकर्त्यांनी तो लाईक केला आहे. काही अंधभक्त लोक तर याला बालभक्त प्रल्हाद म्हणत आहेत.