मुंबई : सोशल मीडियावरती आपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात. तुम्ही सोशल मीडियावरती लग्नाचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल जे पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरलं नसेल. लग्नात असे बरेच प्रसंग घडतात. जे मनोरंजक असतात. सध्या असाच एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. जो तुम्हाला आश्चयचकित केल्याशिवाय राहाणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न हा प्रत्येक नववधू आणि नवरदेवासाठी महत्वाचा क्षण असतो. तो क्षण ते आनंदाने जगतात देखल. परंतु या सगळ्यात भावनीक क्षण असतो, तो पाठवणीचा.


जेव्हा नववधू आपल्या माहेरच्यांना सोडून आपल्या नवऱ्यासोबत सासरी जाते तेव्हा हा क्षण तिच्यासाठी खूपच भावनीक असतो, या वेळी संपूर्ण घराचं वातावरण बदलून जातं.


परंतु आता काळ बदलला आहे, त्यामुळे आजच्या मुली सासरी जात असताना रडत नाहीत. तेसच सध्याच्या नववधूंना आपला मेकअप खराब होईल याची भीती असते, म्हणून त्या जास्त रडत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नववधू निरोपाच्या वेळी रडताना दिसत आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये, आपण पाहू शकता की एक वधू तिच्या निरोपाच्या वेळी खोटं खोटं रडत असते. एवढंच काय तर ती खूप जोरात रडत असते. परंतु त्याचवेळी नवरदेव नववधूसोबत असं काहीतरी कृत्य करतो, ज्यानंतर नववधूचा आवाज अचानक बंद होतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नववधू मोठ्याने रडत असते, तेव्हा तिचा नवरदेव तिला आपल्याकडे घेऊन समजवण्याचा प्रयत्न करतो आणि तिली मीठी मारतो, ज्यामुळे नववधू थोडी शांत होते. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. व्हिडिओवर सोशल मीडिया खूप व्हायरल झालं आहे, ज्यावर लोकं मजेदार कमेंट्स देखील करत आहेत.


हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स वधूला नौटंकी म्हणत आहेत. काही यूजर्स वधूच्या अश्रूंना मगरीचे अश्रू म्हणत आहेत. व्हिडीओच्या शेवटी नवरदेवही हसताना दिसत आहे. नववधू नौटंकी करत आहे हे नवरदेवाला आधीच माहित होते. परंतु त्याने ज्यापद्धतीने परिस्थिती सांभाळली, हे पाहून लोकं त्या नवरदेवाचं कौतुक करत आहेत.