बायको आहे की शक्तिमान? या `घुमर` डान्सने सारेच थक्क; Video चा शेवट पाहून बसेल धक्का
Bride Falls On Stage: या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्सची संख्याही थक्क करणारी आहे. तब्बल 7.5 हजारांहून अधिक कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
Bride Falls On Stage: सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नासंदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता लग्न सोहळ्यांमुळे या व्हिडीओमध्ये अजून भर पडली आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एका व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओच्या शेवटी जे काही घडलं ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
एवढी गोल गोल फिरली की...
व्हायरल व्हिडीओमध्ये नववधू आणि वर दोघेही स्टेजवर उभे असल्याचं दिसत आहे. दोघेही समोर उभ्या असलेल्या कॅमेरामनकडे पाहत असते. नववधूने डोक्यावर मोठा पदर घेऊन आपला चेहरा लपवला आहे. तर नवरदेव तिचा एक हात वर पकडून उभा आहे. लग्नसोहळ्यामध्ये डीजेने दीपिका पादुकोणच्या 'पद्मावत' चित्रपटातील 'घुमर' गाणं लावल्याचं ऐकू येत आहे. या गाण्यात ज्या प्रमाणे हिरोईन नाचते त्याप्रमाणे गोल फिरत नाचण्याचा प्रयत्न ही नववधू करते. नवरा मुलगा डान्समध्ये फारसा रस दाखवत असल्याचं दिसत नाही. दुसरीकडे उत्साहात नाचणारी नववधू तर 'घुमर'वर एवढी गोल गोल फिरते की पाहताना आपल्यालाच धडकी भरते.
नवरा नुसता उभाच असतो
नवऱ्याने एक हात पकडलेला असतानाच परदेशी डान्सप्रमाणे गिरकी घेऊन नाचण्याचा प्रयत्न करते. ती हळूहळू स्वत:भोवती गिरकी घेत सुरुवात करते आणि इतक्या वेगाने फिरु लागते की तिला शेवटची स्वत:चा तोल सावरता येत नाही. ही वधू अडळखत पडू लागते तरी तिच्या नवऱ्याला काहीही काळजी नसल्याप्रमाणे तो पाहत उभा असल्याचं दिसतो. अखेर ही वधू चक्कर येऊन खाली पडते. मात्र त्यानंतरही नवरा मुलगा ढिम्मपणे उभाच असतो. अखेर स्टेजजवळ उभ्या असलेल्या काही महिला स्टेजवर येऊन या तरुणीला उचलतात.
बायको आहे की शक्तिमान?
खरं तर हा व्हिडीओ जुना असला तरी तो सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत. या व्हिडीओवर साडेसात हजारांहून अधिक कमेंट्स आहेत. एकाने हा असा कसा नवरा आहे जो बायकोची काळजीही घेत नाही असा प्रश्न विचारला आहे. अन्य एकाने ही बायको आहे की शक्तिमान? असा प्रश्न दुसऱ्याने विचारला आहे. अन्य एकाने या व्हिडीओवर हिची चार्जिंग संपल्याने ती पडली असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करुन नक्की सांगा.