रायपूर : सध्या देशभरामध्ये लग्नसराईचे वारे वाहत आहेत. अभिनेत्यांपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच लग्नाच्या या लहरीमध्ये आपआपले जोडीदार निवडत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. लग्नाचा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी म्हणून प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. पण, असं करताना काही हौशी कलाकारांना दणकाही बसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोतून हे स्पष्ट होत आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. 


व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार नवरदेव आणि नवरी एका सुरेख अशा पाळण्यावर बसले असतानाच एकाएकी हा अपघात घडला. 


ग्रँड एंट्री करण्यासाठी म्हणून हा सारा घाट. ज्यावेळी सर्व डान्सर्स आणि इतरही सर्वजण नवरा- नवरीच्या एंट्रीकडे डोळे लावून होते. 


फटाकेही वाजत होते. पण, अचानकच पाळण्याचा हारनेस म्हणजेच एका बाजुचा दोर तुटला आणि ही जोडी जवळपास 12 फुटांवरील उंचीवरुन थेट खाली आदळली. 


अपघात झाल्यानंतर लगेचच तिथे असणाऱ्या उपस्थितांनी एकच किंकाळी फोडली. सूत्रांच्या माहितीनुसार वधू- वराला हलकीशी जुखापत झाली आहे. 



सदर अपघाताची जबाबदारी इवेंट मॅनेजमेंट कंपनीनं घेतली. किंबहुना अपघातानंतर सर्वकाही तासाभराच्या आतच सुरळीत झालं आणि हे लग्न पूर्णत्वास गेलं.