Bride Groom Marriage Video: अररर् थांबा.. लग्न तर होऊ द्या, वऱ्हाड्यांसमोर वधू-वराने असं काही केलं की...
Bride Groom Trending Video: लग्न म्हणजे जेवण, जेवणाला चव असली तर लग्न चांगलं झालं असं म्हटलं जातं. मात्र, स्वत:च्या लग्नात वधू वराने वेगळाच पराक्रम केलाय.
Viral Video: लग्न हे प्रत्येकाच्या (Marriage) आयुष्यातील सुंदर क्षण असतो. एक मुलगी आपल्या लग्नाबद्दल अनेक स्वप्न रंगवते. लग्न हा जेवढा नवरदेवासाठी (Groom) आनंदाचा क्षण असतो तेवढ्याच तो नवरीसाठी (Bride) भावनिक क्षण देखील असतो. अशातच सध्याच्या इंटरनेटच्या युगात कधी कोणता व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होईल, सांगता येत नाही. अशातच लग्नाचा सिझन (Wedding season) सुरू असताना आता वधू आणि वराचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दितोय. (Viral Video Bride Groom watched Bigg Boss in front of everyone present at the wedding trending video marathi news)
जेव्हा लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Trending Video) होतात, तेव्हा यूजर्सची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असते. कधी व्हिडिओ लोकांना आवडतात तर कधी राग व्यक्त केला जातो. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू आणि वर (Bride Groom Marriage Video) जे काही करतात, ते पाहून वऱ्हाड्यांनी डोक्याला हात लावला आहे.
आणखी वाचा - Bride Groom Kiss: मंडपातच वधू-वर झालेत रोमँटिक, दोघेही स्वतःला रोखू शकले नाहीत आणि ...
Video मध्ये काय दिसतंय?
लग्नात जेवण्याशिवाय मजा नाही. सर्वांचं जेवण झाल्यानंतर वधू वर (Bride Groom) जेवायला बसतात. अशातच शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये लग्न उरकल्यानंतर दोघंही जेवायला बसतात. एकत्र बसून जेवायला सुरूवात करतात. विशेष म्हणजे दोघांना रिअॅलिटी शो बिग बॉस आवडत असतो. त्यामुळे लग्नात जेवण करत असताना दोघेही मोबाईलवर बिग बॉसचा एपिसोड पाहत असल्याचं दिसतंय.
पाहा Video -
दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ तुफान (Viral Video) व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय. दोघांचा हा प्रकार लग्नात फोटोशूटसाठी (PhotoShoot) आलेल्या कॅमेरामॅनच्या नजरेत येतो. त्यावेळी तो हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करतो. या व्हिडिओवर अनेक कमेंट येत असल्याचं पहायला मिळतंय. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हा वधू वराचा व्हिडिओ शेअर देखील केला जातोय.