वर्कआऊटं वेड माणसांनाच नाही तर `यांना`ही, एकदा हा व्हिडीओ पाहाच
सध्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ व्हायरल होतोय.
मुंबई : सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात. लहान मुलं आणि प्राण्याचे व्हिडीओ पाहून तर हसू आवरत नाही. सध्या तरुणाई आरोग्यासाठी खूप जागृत आहे. त्यामुळे तरुणांईला जीमचे वेड लागलं आहे. ही तरुणाई तासंतास आपल्या वेळ जीममध्ये घालवताना दिसतात. व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ व्हायरल होतोय. तुम्ही जर मांजराचे फॅन असाल तर हा व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडेल. या व्हिडीओमध्ये एका जीममध्ये मांजरीला फिटनेसचं वेड लागलेलं दिसतंय.
तुम्ही पाहिलं आहे का अशी मांजर जी जिममध्ये जाऊन व्यायाम करतेय. नाही ना, तर मग हा व्हिडीओ पाहा. या मांजरीचा व्यायाम पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
या व्हिडीओमध्ये एक एक्सरसाइज मशीन ठेवली आहे. या मशीन जवळ एक गोंडस मांजर येते आणि आपला वर्कआऊट सुरु करते. मांजरीचा हा वर्कआऊट पाहून तुम्ही थक्क व्हाल. वर्कआऊटपासून कोणाचीही सुटका नाही असं काहीसं या मांजरीकडे पाहून वाटतं आहे.
24 सेकंदच्या या व्हिडीओला आतापर्यंत 11 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 16 हजार वेळा या व्हिडीओला रीट्वीट करण्यात आलं आहे.