Mother Son Video :  लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघितले जातात. गोंडस आणि निरागस असे हे चिमुकले क्षणात आपलं हृदय जिंकतात. या मुलांचे स्वच्छ सुंदर मन आणि बोबड्या बोलाने त्यांचे प्रश्न अनेक वेळा आपल्या बुचकळ्यात पाडतात. त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. सोशल मीडियावर असेच अनेक गोड आणि नटखट मुलांचे व्हिडीओ पाहिला मिळतात. पण सध्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. 


अन् त्याने आईला ओळखलंच नाही!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मजेदार व्हिडीओमध्ये एक महिला कुठल्या तरी कार्यक्रमासाठी लेंहगा, हेअरस्टाइल आणि मेकअप करुन तयार झाली आहे. त्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चार पाच वर्षांचा छोटा मुलगा जोर जोरात रडत आहे. कारण त्याला त्याची मम्मी हवी आहे. ती तर त्याचा समोर छान नवरीसारखी तयार होऊन उभी आहे. तरीदेखील तो चिमुकला आकांड्यतांडव करतोय. माझ्या मम्मीला बोलवा असं तो सारखं म्हणतं आहे.


मेरी मम्मी कहा है?


खरं तर आईने मेकअप केल्यामुळे तो मम्मीला ओळखू शकत नाही आहे. त्याची आई वारंवार त्याला सांगतेय मीच तुझी आई आहे. पण तो काही केल्या विश्वास ठेवत नाही. या व्हिडीओमध्ये अजून एका महिलेचा आवाज येतो आहे. ती देखील त्याला सांगतेय की हिच तुझी आई आहे. पण तो रडत सुटतो. अखेर त्याची आई सोफ्यावर त्याचा जवळ जाऊन बसते आणि त्याला जवळ घेऊन सांगण्याचा प्रयत्न करते मीच तुझी आई आहे. पण तो घाबरतो आणि तिथून बाजूला पळून जातो. 


हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असून तो यूजर्सला हसून लोटपोट करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील  visagesalon1 या प्रोफोईलवर पोस्ट करण्यात आला आहे. हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरतोय. (viral video child scared and cry if the mother does not recognize mother after makeup Social media trending now)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओवर कंमेंट्सचा पाऊस पडतो आहे. एका यूजर्सने महिलेला मेकअप पाण्याने धुण्याचा सल्ला दिली आहे. तर एकाने म्हटलं आहे की, ''मुलाने नाही ओळखलं ठिक आहे, पण मुलाच्या वडिलांनी पण नाही ओखळलं तर गडबड होईल.''