Viral Video : मुलगी म्हटलं की मोठी झाली की तिचं लग्न करण्यात येणार. आपल्या जोडीदार कसा असावा याबद्दल मुलींच्या मनात एक चित्र तयार असतं. मुलगी आणि वडिलांचं नातं खूप खास असतं. अशा आपला जोडीदार हा आपल्या वडिलांसारखा असावा असं तरुणींना वाटतं. आजकालच्या तरुणींचं जोडीदाराबद्दलच्या कल्पना आणि अपेक्षा अगदी स्पष्ट असतात. तरुणींना आपला होणारा नवरा किंवा जोडीदार कसा असावा याबद्दल त्या खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. तरुणाच्या दिसण्यापासून, स्वभाव, करिअर आणि पैसा हे सगळं पाहिलं जातं. सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तिला जोडीदाराबद्दल विचारण्यात आलं. तिचं उत्तर हे नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करुन सोडत आहे.


 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर या तरुणीचा व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये एक तरुणी दुसऱ्या तरुणीला विचारते की, 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' त्या तरुणीचं उत्तर ऐकून प्रत्येक जण हैराण झालं आहे. 33 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून इंटरनेटवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामच्या memecentral.teb's profile picture या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतोय. 


तरुणीचं उत्तर ऐकून व्हाल थक्क


तरुणीने नक्कीच रामाचं नाव घेतलं असेल असं तुम्हाला वाटतं असेल. पण थांबा या तरुणीने जोडीदाराची निवड करताना राम नाही रावणाची निवड केली आहे. हो अगदी बरोबर ऐकल तुम्ही. 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' तर यावर तिने रावणासारखा जोडीदार हवा आहे असं ठणकावून सांगितलं आहे. तिच्या या निवडीबद्दल तिने कारणही सांगितलं आहे. मात्र तिचं हे उत्तर ऐकून नेटकऱ्यांकडून टीका होते आहे. 


रावणाची निवड करण्यामागे काय दिलं तर्क?


रावणाची जोडीदार म्हणून निवड करताना तिने तर्कही मांडलं आहे. तरुणी म्हणाली की, रावण हे सीताजींवर प्रेम करायचे. त्यांनी सीताजींना हात न लावता त्यांचं अपहरण केलं. आजच्या  आहे की रावणाचे सीताजींवर प्रेम होते. त्याने सीताजींना हात न लावता त्यांचे अपहरण केले. आजच्या कलियुगात पुरुषांनी आपल्या बायकोवर आणि समाजावर थोडं वर्चस्व गाजवायला हवं. रावणाने जरी सीताजींचं अपहरण केलं असलं तरी त्याने सीताजींवर कोणताही अन्याय केला नाही. सीताजी इतकं दिवस लंकेत होती, तरीही रावणाने गैरवर्तन केलं नाही. म्हणूनच या कलियुगात माझा जोडीदार रावणसारखा असावा असं मला वाटतं. 



नेटकऱ्यांकडून तरुणीवर टीका 


व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर यूजर्सने आपापल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'आदि पुरुषाला पाहून आली ही तरुणी', दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'तिला रावणच मिळावा.'