मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचे कौतूक करत आहे. दरम्यान या कुत्र्याने असं काय केलंय ज्यामुळे त्याचे इतकं कौतूक होतेय, ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुत्रा हा एक निष्ठावान प्राणी आहे आणि तो नेहमीच आपला प्रामाणिकपणा सिद्ध करत असतो. या संबंधितचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, मालक पाण्यात उडी मारण्यासाठी धावतो, त्याच्या मागे त्याचा कुत्राही धावतो
मालक पाण्यात उडी मारल्यानंतर तळाशी जातो. कुत्रा मात्र त्याची पाण्यावर येण्याची वाट पाहतो. 


दरम्यान अनेक सेकंद मालक पाण्यातून वर न येत असल्याचे पाहत कुत्रा मालकाच्या बचावासाठी धडपड करतो. पाण्याशेजारी असलेल्या एका प्लॅस्टीकच्या न तरंगणाऱ्या त्या वस्तुवर चढून तो मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो.इतक्यात मालक पाण्यावर येतो. मालक दिसताच कुत्रा पाण्यात उतरत त्याच्या जवळ जातो. असे या व्हिडीओत दिसत आहे. 



 सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर कमेंट करत आहेत. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचं नेटकरी कौतूक करतायत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, कुत्रे खरोखर खूप निष्ठावान असतात. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, मी अशा प्राण्याशी खूप संलग्न आहे.


 दरम्यान हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.