लग्नात नवरदेवचं असं कृत्यं जे पाहून नववधूच्याही चेहऱ्याचा उडाला रंग, व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर मंडपात बसले आहेत.
मुंबई : मुलगा असो की मुलगी लग्न ही गोष्ट दोघांच्याही आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण आहे. लग्नानंतर या जोडप्याच्या आयुष्याची एक नवीन सुरूवात होते. त्यात मुलीच्या आयुष्यातील हा सर्वात भावनीक क्षण असतो, कारण यानंतर ती आपल्या घरच्यांपासून लांब जाणार असते. आजकालचे जोडपं तर सगळं स्वत:च ठरवतात. म्हणजे लग्नात कोणचे कपडे घालायचे, कोणत्या गाण्यावर एन्ट्री करायची आणि कोणत्या हॉलमध्ये लग्न करायचं, हे सगळं त्यांचं तेच ठरवतात.
परंतु अशावेळी जर जोडीदारापैकी एकानं जरी शेवटच्या क्षणी घोळ केला तर? किंवा लग्नाला नकार दिला तर? समोरच्या व्यक्तीची काय मनस्थिती होईल? त्याच्यावर कोणती वेळ येईल याचा आपण कधीही विचार देखील करु शकत नाही.
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या दुनियेत पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये भरमंडपात मंगळसूत्र घालत असताना नवरदेवानं असं कृत्य केली सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर मंडपात बसले आहेत, जिथे लग्नाशी संबंधित विधी पूर्ण केले जात आहेत. ज्यामुळे सगळ्यांच्या नजरा नवरा-नवरीकडे आहेत. फोटोग्राफर देखील हे क्षण आपल्या कॅमेरात कैद करायला सज्ज झाले आहेत.
जेव्हा भट नवऱ्याला नववधूच्या गळ्यात मंगळसुत्र घालायला सांगतो तेव्हा नवरदेव उठून उभा राहतो आणि नववधूच्या गळ्यात मंगळसुत्र घालायला जातो, त्यावेळी नववधूच्या मागे तिची आई आणि इतर मंडळी उभी असतात. त्यामध्ये एक मुलगी देखील उभी आहे.
तेवढ्या नवरदेव आपल्या नववधूच्या गळ्यात मंगळसुत्र न घालता दुसऱ्याच मुलीच्या गळ्यात ते बांधतो जे पाहून तेथे उपस्थीत सगळ्यांनाच धक्का बसतो. यामध्ये सगळ्यात मोठा धक्का बसतो तो नववधूला.
नववधूला विश्वासच बसत नाही की तिच्या नवऱ्यानं असं काही कृत्य केलं आहे. वराच्या या कृतीवर आजूबाजूचे लोक रागावतात आणि जोरजोरात ओरडतात. मात्र, यादरम्यान कोणाच्या तरी हसण्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येतो.
हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे? हे काही समजलेलं नाही, पण लग्नाच्या विधी आणि नववधू आणि नवरदेवाचे कपडे पाहाता हे लग्न दक्षिण भारतातील एका लग्नाच्या ठिकाणचे असल्याचे समजत आहे. हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे आणि नेटिझन्सही नवरदेवावरती रागवत आहेत आणि त्याच्या कृतीला चुकीचे सांगत आहेत.