"सरतेशेवटी, तुमच्या आयुष्याला मोजण्यासाठी काही वर्षे नसतात,ती तुमच्या आयुष्यातील वर्षे असतात"अब्राहम लिंकन यांच्या (Abraham Lincoln) या वाक्यामध्ये खूप सत्य आहे.आयुष्य कधीही वर्षांनी मोजू नये कारण आतून तरुण राहणं हेच महत्त्वाचं ठरतं. पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्या शारीरिक मर्यादांमुळे आपण अधिक स्थिर होऊ लागतो. परंतु हे एखाद्या गोष्टीचा आनंद  मजा न घेण्याचे कारण असू शकत नाही. याचाच प्रत्यय एका व्हायरल व्हिडीओमधून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बागेत मजा मस्ती करणाऱ्या वृद्ध नागरिकांचा (Senior Citizens) एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे वय म्हणजे फक्त एक संख्या असल्याचे सिद्ध झालं आहे. व्हिडीओमध्ये वृद्ध नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे ते भरपूर आनंदी असल्याचे दिसत आहेत.


या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध महिला झोका घेताना दिसत आहेत. तर घोड्यावर बसून राइडचा आनंद घेत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ  pala_achayan_achayathees नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.


बॅकग्राऊंडला मल्याळम चित्रपटातील गाणं ऐकायला येत आहे. तीनही वृद्धांच्या चेहऱ्यावरुन ते खूपच आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे.


या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वय फक्त एक संख्या आहे, असे म्हटलं आहे. पाच दिवसातच हा व्हिडीओ 60 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 4 हजार पेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.


 



वृद्ध नागरिकांच्या या व्हिडीओचे अनेकांनी कौतुक केलं आहे.