मुंबई : कोणताही व्यक्ती आपलं पोट भरण्यासाठी काम करतो. परंतु काही वेळा कंटाळा आला म्हणून किंवा थोडा विरंगुळा म्हणून कर्मचारी इकडे तिकडे आपला वेळ घालवतात आणि हे सहाजीक आहे. प्रत्येक व्यक्तीची मानसिक स्थिती ही एकसारखीच असते असे नाही किंवा प्रत्येक व्यक्ती सतत काम करु शकत नाही, त्यामुळे त्याचा थोडाफार विरंगूळा हा होणारच. ज्यामुळे तो व्यक्ती त्याच्या पद्धतीने त्याचं मन रमवून आपलं काम करु पाहतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु असे असले तरी, बॉसला नेहमी असे वाटत असते की, त्याच्या कामगारांनी फक्त कामच करावं. त्यामुळे त्याला जर एखादा कर्मचारी काम सोडून इतर काही करताना दिसला, तर मात्र त्या व्यक्तीचं काही खरं नाही.


आज आम्ही तुम्हाला असाच एक मजेदार व्हिडीओ दाखवणार आहोत. जो पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही.


हा व्हिडीओ एका ऑफिसमधील आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कर्मचारी आपल्या कम्प्यूटरवर बसून व्हिडीओ गेम खेळत असतो. परंतु तेवढ्यात त्याचा बॉस येतो, तेव्हा आपल्या बॉसपासून हे लपवण्यासाठी तो एक जुगाड वापरतो, आणि आपल्या कम्प्यूटरवरील विंडो काही सेकंदात बदलतो. जेणे करुन त्याच्या बॉसने पाहिले तरी त्याला वाटेल की, हा काम करत असावा.


तो बॉस दोन तिन दा मागे वळून पाहतो परंतु तो कर्मचारी इतका हुशार असतो की, तो प्रत्येक वेळेला काही सेकंदात आपल्या समोरील स्क्रिनवरील विंडो बदलतो.


जेव्हा बॉस त्याच्या कर्मचाऱ्याला पकडू शकला नाही, तेव्हा त्याने एक नवीन युक्ती करायचे ठरवले. बॉसने त्याच्या मोबाईल फोनचा सेल्फी कॅमेरा चालू केला आणि आपल्या पाठीमागे त्या कर्मचाऱ्याला बघायला सुरुवात केली, पण या दरम्यान कर्मचारी देखील हुशार निघाला त्याने पुन्हा काही सेकंदात आपल्या स्क्रिनसमोरील विंडो बदलली.


हा कर्मचारीही इतका हुशार निघाला की, त्याने बॉसपासून वाचण्यासाठी चांगलाच जुगाड शोधून काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बॉस आणि कर्मचारी यांच्यातील लपंडावाचा हा खेळ खरोखरंच खूप मजेदार आणि पाहण्यासारखा आहे.



बॉस आणि त्याच्या कर्मचाऱ्यांमधील हे असं भांडण खरोखर खूपच मजेदार आहे. हा व्हिडीओ फेसबुकवर Anywhenby Share या अकाउंटवरुन शेअर केले गेले आहे. हा व्हिडीओ 9 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, लोक कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, 'जर स्मार्टनेस लेव्हल 9999% असेल तर बॉसची काय गरज आहे.' त्याचबरोबर काही यूजर्सने असे काही कमेंट्स केले आहे, ज्याला तोड नाही.