Heart Attack : मृत्यू कधी आणि कसा येईल हे काहीच सांगता येत नाही. अगदी धडधाकट वाटणारा व्यक्तीही पुढच्या क्षणी मृत्यूच्या दाढेत ओढला जातो. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मित्रांशी गप्पा मारताना एक धडधाडक तरुण बसल्या जागेवर कोसळला आणि पुन्हा उठलाच नाही. मृत्यूचा हा लाईव्ह थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यूचा लाईव्ह थरार
मध्यप्रदेशमधल्या रिवा इथली ही दुर्देवी घटना आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका कार्यालयात पाच मित्र गप्पा मारताना दिसत आहेत. गप्पा मारता-मारता यातला एक तरुण बसल्या जागेवरच कोसळता दिसत आहेत. अचानक झालेल्या या घटनेने थोडावेळ काय झालंय हे इतर मित्रांना कळलच नाही. पण लेगच सावरत मित्रांनी त्याला उचललं. 


पण तो काहीच हालचाल करत नसल्याने मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण उपचाराधीच तरुणाचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण हार्ट अटॅक (Heart Attack) सांगितलं. मन सुन्न करणारी ही घटना 20 ऑक्टोबरची आहे. 


कोण होता मृत तरुण?
मिळालेल्या माहितीनुसार रिवा इथल्या बजरंग नगर इथं 31 वर्षांचा प्रकाश सिंह बघेल हा कुटुंबासोबत राहात होता. परिसरतील एका दुकानात तो आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. अचानक प्रकाशच्या छातीत दुखू लागलं आणि तो खाली कोसळला. मित्रांनी त्याला CPR देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. 


कोणताही आजार नव्हता
प्रकाशच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाशला कोणताही आजार नव्हता. प्रकाशच्या मृत्यूच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



हार्ट अटॅकमुळे मृत्यूच्या घटनेत वाढ
14 ऑक्टोबरला छिंदवाडामध्ये हार्ट अटॅकमुळे मृत्यूची अशीच एक घटना समोर आली होती. बेलगांव लिखावाडी इथं शाळकरी मुलांना सोडायला जाणाऱ्या स्कूल बसच्या चालकाला श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरु झाला. त्याने बस रस्त्याच्या किनारी आणली आणि बसच्या स्टिअरिंगवर डोकं ठेवलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.


त्याआधी तीन फेब्रुवारीला एका हॉटेलमध्ये नाश्ता करत असताना रस्ते बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. नाश्ता करतानाच तो खाली कोसळला. त्याला रुग्णालायत घेऊन जाण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.