मुंबई : सोशल मीडियाचे जग खूप धमाल आहे. दररोज येथे मोठ्या संख्येने असे व्हिडीओ अपलोड केले जातात जे सर्वांचे मनोरंजन करतात, लोकांना हसवतात आणि माहिती देखील देतात. यावेळी असाच एक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आहे. हा व्हिडीओ एका मुलीचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला सोशल मीडियावरील डान्स किंवा ऍक्टिंगचे व्हिडीओ पाहून आपण देखील तसे करावे असे वाटत असते, ज्यामुळे ते आपले असे वेगवेगळे फोटो किंवा व्हिडीओ कॅमेरात शूट करतात आणि सोशल मीडियावरती शेअर करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डान्सशी संबंधित या व्हिडीओमध्ये या दोन मुली देखील असाच एक पॉप्यूलर डान्स स्टेप रेकॉर्ड करत असतात. परंतु त्यांच्यासोबत जे पुढे घडतं ते पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि तो नेटिझन्सनाही तो खूप आवडला आहे.


काही सेकंदांचा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी शॉर्ट व्हिडीओ अॅपसाठी डान्स व्हिडीओ शूट करत आहे. तर एक मुलगी डान्स स्टेप करत आहे. या मुली घराच्या छतावर हा व्हिडीओ शुट करत असतात.


ही मुलगी काही स्टेप्स करत असते, तिचा डान्स सुरूच असतो तेव्हाच त्यांच्या लक्षात येते की वरुन आपल्याला कोणी पाहात आहे, तसेच ते वाऱ्याच्या वेगाने तेथून पळून जातात.



अशा प्रकारचे अनेक मजेदारचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट केल्या आहेत. एक यूजर म्हणाला - तिची मम्मी आली आहे. तर दुसऱ्याने या कमेंटमध्ये म्हटलं होतं- दीदीच्या वडिलांनी ते पाहिलं, त्यामुळे ती लाजली.