Viral Video: नियम फक्त सर्वसामान्यांनाच का? हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांना दोन तरुणींनी अडवली अद्दल
UP Cops Riding Without Helmets: नुकताच हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतही दोन पोलीस कर्मचारी बिना हेल्मेट बाइक चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
UP Cops Riding Without Helmets Viral Video: सर्वसामान्यांना सतत रस्ते वाहतूक नियमाची आठवण करु दिली जाते. गेल्या काही वर्षात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना करण्यात येणाऱ्या दंड रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. दोनचाकी चालवताना हेल्मेट सक्ती आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी वाहनचालकासोबतच दोनचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
नियम फक्त सर्वसामान्यांसाठी का?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी बाइकवरुन हेल्मेट न घालता प्रवास करत आहेत. हे पाहिल्यावर स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरुणीने त्या पोलिसांना विचारलं, ''हेल्मेट न घालता गाडी का चालवत आहात?'' ते पोलीस काही न बोलता बाइक पळवत होते. (viral video girls chased policemen asked wear helmet record video UP ghaziabad trending news on Social media )
मुली काही थांबल्या नाही त्यांनीही स्कुटीची स्पीड वाढवली आणि त्यांना जोरजोरात विचारायला लागल्या, ''तुमचं हेल्मेट कुठे आहे?'' रस्त्यावर पोलीस आणि त्या तरुणींमधील हा ड्रामा रस्त्यावरील इतर दुचाकीवरील चालकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. शिवाय त्या तरुणींच्या धाडसाचं कौतुक होतं आहे. स्कुटीवरील तरुणीने बऱ्याच दूरपर्यंत या पोलिसांचा पाठलाग केला.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेश गाझियाबादमधील आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी याची दखल घेतली आहे. या दोन पोलिसांवर नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
हा व्हिडीओ @ImranTG1 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्तालय गाझियाबादच्या ट्विटर हँडलवरून हेल्मेट न घातलेल्या पोलिसांवर कारवाई केली असून त्यांना 1000 रुपयांचा चालान काढण्यात आला. या चालानचा फोटोदेखील त्यांनी शेअर केला आहे.