Viral Video : सध्याच्या जमान्यात क्वचितच कोणी तरी असेल ज्याला मोबाईल (Mobile) वापरता येत नाही किंवा त्याबद्दल थोडीफारही माहिती नसेल. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण आता मोबाईल हाताळताना दिसून येतात. मात्र वयोमानानुसार अनेकजण आजही तंत्रज्ञानापासून (Technology) मागे राहिले आहेत. आपल्याही घरातील आजी आजोबांना आजही कोणासोबत फोनवर बोलायला दिलं तर ते समोरच्या व्यक्तीसोबत बोलून फोन पुन्हा आपल्याकडे देतात. तो फोन कट केला आहे की सुरु आहे याकडे त्यांचे लक्ष नसते. त्यामुळे वयस्कर आजी-आजोबांना तंत्रज्ञानाचे अवलंब करणे अवघड जाते. अशाच एका आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक नातवंडे त्यांच्या आजी-आजोबांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करायला शिकवतात तर कुणी फोनवरून पैसे ट्रान्सफर करायला शिकवतात. याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. अशाच एका आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या आजीने एका व्यक्तीला फोन लावला होता. मात्र तिने दिलेले उत्तर ऐकून सर्वांनाच हसू फुटले आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये एका वृद्ध आजीने फोनवर बोलताना समोरुन बोलणाऱ्या मुलीच्या आवाजाला (इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) चांगलेच झापले आहे. एका आजीने कोणाला तरी फोन लावला होता. मात्र समोरच्या व्यक्तीने फोन उचलला नाही आणि ऑटोमेटेड रिस्पॉन्समध्ये मुलीच्या आवाजाच तुम्ही ज्या नंबरवर कॉल करत आहात तो उत्तर देत नाही,असे ऐकू आले.


हे ऐकून आजी चिडली आणि तिने समोर कोणीतरी बोलत आहे असे समजून झापण्यास सुरुवात केली. आजीने तू का उत्तर देत आहेस मग? आम्ही कॉल करतो आहोत तर तुला काय करायचे आहे? तुला काय झालं मध्येच बोलायला? आम्ही आमचे बोलत आहोत. तू कशाला मध्ये उडी मारतेस? अशा शब्दात सुनावलं.


पाहा व्हिडीओ - 



हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आजीच्या स्वॅगचे कौतुक केले आहे. एका युजरने या आजीमुळे चॅटजीपीटीला भारतात थोडं सावध राहावं लागेल असं म्हटलं आहे. आयपीएस अधिकारी राहुल प्रकाश यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ कुठला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.