Viral Video : कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं, हे आपण अनेकदा ऐकलं असेल. एखादं काम करण्याचा कमीपण वाटणार व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीच पुढे जात नाही.  आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याची ज्याच्यात धमक असते तो अंगावर पडेल ते काम करुन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. नागपूरचा डॉली चहावला (Dolly Chahawala) एका रात्रीत स्टार झाला. आज त्याला देशविदेशातून बोलावलं जातं. अनेक कार्यक्रमांना तो उपस्थित राहातो. एखादा उच्चशिक्षित किंवा लाखोत कमाई करणाराही जे करु शकत नाही ते डॉली चहावाल्याने करुन दाखवलं. आता सोशल मीडियावर आणखी एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिलेची दररोजची कमाई ऐकून थक्क व्हायला होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

aapkartekyaho या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रस्त्याच्या कडेला ठेला लावणाऱ्या विक्रेत्यांची दररोजची कमाई किती होते याचे व्हिडिओ शेअर केले जातात. या अकाऊंटवरुन एक महिलेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहो. ही महिला रस्त्याच्या कडेला बसून इडली-सांबार विकते. या महिलेला तिची दररोजची कमाई विचारण्यात आली. त्यावर तीने दिलेलं उत्तर ऐकून लोकं थक्क झालीत.


लोकांच्या पसंतीस पडली चव
महिला रस्त्याच्या कडेला इडली-सांबार विकते आणि त्याची चव लोकांच्या पसंतीस पडली आहे. इडली-सांबारची एक प्लेट तीस रुपयांना विकली जाते, आणि दिवसभरात तिने आणलेल्या संपूर्ण इडल्या संपतात. पन्नास प्लेटपासून या महिलेने आपला व्यवसाय सुरु केला होता. आता ती महिला दिवसाला 150 प्लेटस इडली-सांबारची विक्री करते. 



महिन्याची कमाई लाखोत
150 प्लेट्सच्या विक्रीतून ही महिला दिवसाला जवळपास 4500 रुपयांची कमाई करते. म्हणजे महिन्याची या महिलेची कमाई जवळपास सव्वालाख रुपये इतकी आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. उच्चशिक्षित व्यक्तीलाही महिन्याला इतका पगार नसेल असं काही लोकांनी म्हटलंय. तर काही लोकांनी हिशोबच मांडलाय. फूड बिझनेसमध्ये चाळीस ते पन्नास टक्के प्रॉफिट मार्जिन असतं, या हिशोबाने सर्व खर्च वगळात ही महिलेला दिवसाला दोन ते अडीच हजार रुपयांचा फायद होत असेल म्हणजे ती महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपयांची कमाई करते, असं काही लोकांनी म्हटलंय.