Viral video : पैशांचा पाऊस आणि भारतीय जुगाड, पाहा व्हिडीओ
तुम्ही विचार केला आहे का? की पैशांचा पाऊस पडायला लागल्यावर तुम्ही कसे पैसे जमा कराल? कारण इतके पैसे हाताने जमा करने तर शक्य होणार नाही.
मुंबई : पैशांचा पाऊस ही आपल्या स्वप्नातली कल्पना आहे. आपल्या समोर कोणत्याही समस्या आल्या तरी आपण असा विचार करतो की, असं काही तरी झालं पाहिजे की, पैशांचा पाऊस पडायला लागला पाहिजे आणि माझ्या सगळ्या समस्या दुर झाल्या पाहिजेत. पण तुम्ही विचार केला आहे का? की पैशांचा पाऊस पडायला लागल्यावर तुम्ही कसे पैसे जमा कराल? कारण इतके पैसे हाताने जमा करने तर शक्य होणार नाही.
आपल्या विचारात असलेली घटना भारतातील एका भागात खरी ठरली आहे. इथे एका लग्नाच्या वरातीत आनंदाच्या भरात लोकं रस्त्यात पैसे उडवत आहे आणि चक्कं रस्त्यावर पैशांचा पाऊस पाडत आहेत. त्यामुळे या वरातीच्या पाठी लोकांची पैसे गोळा करायला जुंपली आहे. जो व्यक्ती जसे जमेल तसं पैसे गोळा करत आहे. तर काही जुगाड मंडळींनी असा काही जुगाड केला की, त्याच्या मदतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ते पैसे जमा करु शकतात. ते ही लोकांच्या गर्दीत जास्त धडपड न करता.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, पैसे लुटण्यासाठी एका व्यक्तीने एक मोठे जाळे आणले आहे आणि हवेत त्याला फिरवून त्यात नोटा भरल्या जात आहे.
या जाळ्यामुळे या माणसाकडे सगळ्यांपेक्षा जास्त पैसे जमा झाले आणि ज्यांच्याकडे असे जाळे नव्हते, त्यांना फक्त दोन-चार नोटींवर समाधान मानावे लागले. कारण इतक्या लोकांच्या गर्दीत घुसून जास्त पैसे गोळा करणे शक्य नव्हते. हा व्हिडिओ शानू खान नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
आतापर्यंत 1 लाख 38 हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक्स केले आहे. तर पुन्हा एकदा भारतीय लोकांचा जुगाड या व्हिडिओच्या माध्यमातून लोकां समोर आला आहे, ज्यावर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.