Video :आयुष्यात हे जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं; नारायण मूर्ती आणि कुटुंबीयांचा साधेपणा पाहून सगळे भारावले
Infosys co-founder Narayana Murthy : कितीही यश मिळो, जगात नाव कितीही मोठं होवो... गर्वाला जवळपासही फिरकू न देणं जमलं तरच तुम्ही खरे यशस्वी.... नाही का?
Infosys co-founder Narayana Murthy : भारतीय उद्योग जगतासह व्यवसाय क्षेत्रामध्येही काही नावं प्रकर्षानं समोर येतात. या व्यक्तींचा संघर्ष इतका मोठा असतो, की तो पाहताना अनेकांना प्रोत्साहन मिळतं. अशा व्यक्तींच्या यादीतलं एक नाव म्हणजे नारायण मूर्ती. इन्फोसिसचे सहसंस्थापक अशी त्यांची जगभरात ओळख. याशिवाय प्रख्यात व्यक्तीमत्त्वं सुधा मूर्ती यांचे पती आणि ब्रिटच्या पंतप्रधानांचे सासरे अशीही त्यांची ओळख. मुळात जागतिक स्तरावर नारायण मूर्ती किंवा सुधा मूर्ती ही नावं काही नवी नाहीत.
हे सधन कुटुंब त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत असलं तरीही त्यांच्या लोकप्रियतेचं कारण मात्र थोडं वेगळं आहे. किंबहुना हे कारण अनुकरणीय आहे. प्रत्येकानंच जीवनातील आपल्या टप्प्यामध्ये या कुटुंबाकडून शिकावं असं खूप काही आहे. अशा या कुटुंबानं अर्थात नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, त्यांची लेक अक्षता मूर्ती आणि दोन नाती अशी सर्व मंडळी नुकतीच बंगळुरूतील जयानगर येथे असणाऱ्या राघवेंद्र स्वामी मंदिरात पोहोचले होते. याच क्षणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ब्रिटनच्या First Lady म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण मूर्तींच्या लेकिनंही यावेळी सुरक्षा रक्षकांचा ताफा सोबत आणला नव्हता. तर, कोणत्याही सामान्य भाविकांप्रमाणंच नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती तिथं वावरत होते. एका पुस्तकांच्या दुकानाकडून ही मंडळी पुढे आली. त्या क्षणी तिथं असणाऱ्या काहींच्या ही बाब लक्षात आली आणि हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हारयल झाला.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Budget 2024 : राज्यात निवडणूक नसतानाही अंतरिम अर्थसंकल्प का सादर होतोय?
नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या मंदिरात असताना इतक्या साधेपणानं वावरणं, यामध्ये श्रीमंतीचा गर्व अथवा लवलेशही नसणं अशा अनेक गोष्टी नेटकऱ्यांची मनं जिंकून गेल्या. अनेकदा काही मोठ्या व्यक्तींकडून यशाचा मंत्र देताना कोणत्याही गोष्टीचा गर्व बाळगू नका असं सांगितलं जातं. मूर्ती कुटुंबीय ही बाब आचरणात आणताना दिसतात. थोडक्यात काय, तर जीवनात हे इतकं जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलंच म्हणून समजा.... नाही का?